शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

‘तुळजाभवानी’ची भरारी तर ‘तेरणा’ अधांतरी !; साखर कारखाने पुढील हंगामात तरी गाळप होणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2017 18:39 IST

अवसायनात निघालेल्या तेरणा व प्रशासक नेमलेल्या तुळजाभवानी साखर कारखान्यांच्या भवितव्याबाबत चालू आठवड्यात हालचाली गतिमान झाल्या आहेत़ एकिकडे तुळजाभवानी भाडेतत्वावर सुरु करण्याची प्रक्रिया सुरु झाली तर दुसरीकडे तेरणाच्या अवसायनाचे अंतिम आदेश जारी झाले़ त्यामुळे तूर्त तेरणाचे भवितव्य अधांतरी असल्याचे दिसते आहे़ 

ठळक मुद्देनळदुर्ग येथील श्री तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याची कार्यवाही करण्यासाठी १७ नोव्हेंबर रोजी प्रादेशिक सहसंचालकांनी (साखर) मंजुरी दिली आहे़ तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे भवितव्य मात्र अधांतरी टांगले गेले आहे़ या कारखान्याच्या अवसायनाचे अंतिम आदेश प्रादेशिक सहसंचालकांनी (साखर) २० नोव्हेंबर रोजी काढले आहेत़

उस्मानाबाद : अवसायनात निघालेल्या तेरणा व प्रशासक नेमलेल्या तुळजाभवानी साखर कारखान्यांच्या भवितव्याबाबत चालू आठवड्यात हालचाली गतिमान झाल्या आहेत़ एकिकडे तुळजाभवानी भाडेतत्वावर सुरु करण्याची प्रक्रिया सुरु झाली तर दुसरीकडे तेरणाच्या अवसायनाचे अंतिम आदेश जारी झाले़ त्यामुळे तूर्त तेरणाचे भवितव्य अधांतरी असल्याचे दिसते आहे़ 

नळदुर्ग येथील श्री तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याची कार्यवाही करण्यासाठी १७ नोव्हेंबर रोजी प्रादेशिक सहसंचालकांनी (साखर) मंजुरी दिली आहे़ त्यामुळे परिसरातील शेतकरी, कामगारांच्या आशा पल्लवीत झाल्या असून, पुढील गळीत हंगामात तुळजाभवानी कारखान्याचे बॉयलर पेटण्याची आशा व्यक्त केली जात आहे़ एकीकडे तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखाना सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे़ तर दुसरीकडे तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे भवितव्य मात्र अधांतरी टांगले गेले आहे़ या कारखान्याच्या अवसायनाचे अंतिम आदेश प्रादेशिक सहसंचालकांनी (साखर) २० नोव्हेंबर रोजी काढले आहेत़ तेरणा अवसायनात निघाल्यानंतर तो भाडेतत्त्वावर सुरू करण्यासाठी प्रयत्न होतील, अशी आशा अनेकांना होती़ मात्र, अद्यापपर्यंत या प्रक्रियेला कसलीही गती मिळाल्याचे दिसत नाही़ त्यातच अवसायनाचा अंतिम आदेश निघाल्याने ‘तेरणा’ सुरू होणार की भंगारात विकला जाणार? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे़

साडेतीनशे कोटींचे कर्जतेरणा व तुळजाभवानी साखर कारखान्यांकडे जिल्हा बँकेचे व्याजासह जवळपास साडेतीनशे कोटी रूपये कर्ज आहे़ दोन्ही कारखाने भाडेतत्त्वावर देऊन कर्जवसुलीला परवानगी मिळावी, यासाठी बँकेने प्रयत्न केले आहेत़ मात्र, ‘तेरणा’ भाडेतत्त्वावर देण्याच्या बाबतीत अद्याप परवानगी मिळाली नाही़ तुळजाभवानी कारखाना भाडेतत्त्ववर देण्याची प्रक्रिया प्रशासक करीत आहेत़ त्यामुळे येथून जिल्हा बँकेची कर्जवसुली होणार कशी ? हाच प्रश्न आहे़

आमचे प्रयत्न सुरूयाबाबत ‘डीसीसी’चे चेअरमन सुरेश बिराजदार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, डीसीसी, तेरणा व तुळजाभवानी या सहकारी संस्था आहेत़ तिन्ही संस्था टिकाव्यात यासाठी दोन कारखाने भाडेतत्त्वावर देऊन बँकेची कर्जवसुलीसाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत़ ‘तेरणा’ भाडेतत्त्वावर देण्याला परवानगी मिळावी, यासाठीही पाठपुरावा सुरू असल्याचे बिराजदार म्हणाले़

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने