वैद्यकीय सोयी-सुविधांसाठी पाठपुरावा करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:25 IST2020-12-26T04:25:14+5:302020-12-26T04:25:14+5:30
आयएमएचे प्रदेशाध्यक्ष डॉ. लोंढे यांची ग्वाही कळंब : उस्मानाबाद येथील वैद्यकीय महाविद्यालय लवकरात लवकर कार्यान्वित होण्यासोबतच कळंब येथील उपजिल्हा ...

वैद्यकीय सोयी-सुविधांसाठी पाठपुरावा करणार
आयएमएचे प्रदेशाध्यक्ष डॉ. लोंढे यांची ग्वाही
कळंब : उस्मानाबाद येथील वैद्यकीय महाविद्यालय लवकरात लवकर कार्यान्वित होण्यासोबतच कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयात सर्व सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही इंडियन मेडिकल असोसिएशनचे नूतन प्रदेशाध्यक्ष डॉ. रामकृष्ण लोंढे यांनी दिली.
कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने डॉ. लोंढे यांची आयएमएच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जीवन वायदंडे होते. यावेळी डॉ. पुरुषोत्तम पाटील, डॉ. निलेश भालेराव, आयएमए सचिव डॉ. सत्यप्रेम वारे, डॉ. मीरा दशरथ आदींनी विचार मांडले. प्रास्ताविक डॉ. शरद दशरथ तर डॉ स्वप्निल शिंदे यांनी आभार मानले.
कॅप्शन -आयएमएच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल कळंब येथील डॉ. रामकृष्ण लोंढे यांचा कळंब उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने डॉ. जीवन वायदंडे यांनी सत्कार केला. यावेळी डॉ. सत्यप्रेम वारे, डॉ. पुरुषोत्तम पाटील, डॉ. निलेश भालेराव, डॉ. शरद दशरथ आदी उपस्थित होते.