चव्हाण महाविद्यालयात वन्यजीव दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:32 IST2021-03-05T04:32:09+5:302021-03-05T04:32:09+5:30

तुळजापूर : येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात गुरुवारी जागतिक वन्यजीव दिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने वृक्षसंवर्धन केलेल्या पिंपळवृक्षाचे पूजन बालाघाट ...

Wildlife Day celebrated at Chavan College | चव्हाण महाविद्यालयात वन्यजीव दिन साजरा

चव्हाण महाविद्यालयात वन्यजीव दिन साजरा

तुळजापूर : येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात गुरुवारी जागतिक वन्यजीव दिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने वृक्षसंवर्धन केलेल्या पिंपळवृक्षाचे पूजन बालाघाट शिक्षण संस्थेचे सचिव उल्हास बोरगावकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी महाविद्यालयाचे वृक्षसंवर्धनाचे काम करणारे शरद बागल यांचा संस्थेच्या वतीने उल्हास बोरगावकर यांनी सत्कार केला. यावेळी प्राचार्य डॉ. मोहन बाबरे, उपप्राचार्य डॉ. एन. बी. जाधव, सिनेट सदस्य प्रा. संभाजी भोसले, प्रा. डॉ. ज्योतिबा राजकोंडा, प्रा. डॉ. शिवाजी जेटीथोर, प्रा. डॉ. प्रवीण भाले, प्रा. जी. व्ही. पाटील, प्रा. आमोद जोशी, प्रा. डॉ. एम. जी. देशमुख, प्रा. रमेश इंगळे, पांडुरंग नागणे, शाहूराज घोडके, अशपाक खोडील तसेच विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. डॉ. शिवाजी जेटीथोर यांनी केले तर प्रा. डॉ. जोतिबा राजकोंडा यांनी आभार मानले.

Web Title: Wildlife Day celebrated at Chavan College