चोरट्यांच्या हल्ल्यात पती-पत्नी जखमी

By Admin | Updated: January 4, 2017 20:53 IST2017-01-04T20:53:33+5:302017-01-04T20:53:33+5:30

चोरट्यांच्या हल्ल्यात पती-पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना भूम तालुक्यातील सोन्नेवाडी येथे मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

Wife and wife injured in thieves's attack | चोरट्यांच्या हल्ल्यात पती-पत्नी जखमी

चोरट्यांच्या हल्ल्यात पती-पत्नी जखमी

ऑनलाइन लोकमत
ईट (जि. उस्मानाबाद), दि. 4  - चोरट्यांच्या हल्ल्यात पती-पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना भूम तालुक्यातील सोन्नेवाडी येथे मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या दाम्पत्यावर सध्या उस्मानाबादच्या जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
याबाबत माहिती अशी की, सोन्नेवाडी येथील सतीश भीमराव कुचेकर यांचे सोन्नेवाडी चौकात दुकान व घर एकत्रित आहे. मंगळवारी रात्री कुचेकर दाम्पत्य घरात झोपलेले असताना मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुकानात प्रवेश केला. चोरट्यांनी काऊंटरवरचा मोबाईल ताब्यात घेऊन नंतर इतर साहित्याची शोधाशोध सुरू करताच कुचेकर दाम्पत्याला चोरटे आल्याची चाहूल लागली. त्यामुळे हे दोघेही जागे झाले. ही बाब चोट्यांच्या लक्षात येताच त्यांनी हातातील हातोड्याने सतीश कुचेकर व त्यांच्या पत्नीच्याही डोक्यात हातातील हातोड्याने जोराने वार करून चोरटे फरार झाले. यात हे दाम्पत्य गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर वाशी येथे प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
बुधवारी सकाळी ईटसह वाशी तालुक्यात ही माहिती वाऱ्यासारखी पसरली. परंतु, वाशी पोलिसांनी ही घटना फारसी गांभिर्याने घेतली नाही. बुधवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत एकही पोलिस कर्मचारी घटनास्थळाकडे साधा फिरकलाही नाही. त्यामुळे ग्रामस्थांत संताप व्यक्त होत आहे.

Web Title: Wife and wife injured in thieves's attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.