जमीन सासूला का विकत नाही म्हणत मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:35 IST2021-05-20T04:35:44+5:302021-05-20T04:35:44+5:30

इलाही गैबी महाजन यांची भूम तालुक्यातील म्हैसगाव येथे शेतजमीन आहे. ही शेतजमीन विकत घेण्याचा प्रयत्न सुरु होता. मात्र, इलाही ...

Why not sell the land to the mother-in-law | जमीन सासूला का विकत नाही म्हणत मारहाण

जमीन सासूला का विकत नाही म्हणत मारहाण

इलाही गैबी महाजन यांची भूम तालुक्यातील म्हैसगाव येथे शेतजमीन आहे. ही शेतजमीन विकत घेण्याचा प्रयत्न सुरु होता. मात्र, इलाही हे जमीन संबंधित महिलेला विकण्यास तयार नव्हते. त्यामुळे अकबर पठाण, हमजा पठाण, रफिक पठाण, शाहीद पठाण या चौघांनी १६ मे रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास भूम येथील एमआयडीसी रस्त्यावर इलाही यांना गाठले. येथे त्यांनी शेतजमीन आमच्या सासूला का विकत नाही, अशी विचारणा करीत शिवीगाळ सुरू केली. नंतर वाद वाढत गेल्यावर या चौघांनी इलाही यांना लोखंडी पाईपने मारहाण करुन जखमी केले. तसेच जिवे मारण्याची धमकीही दिली. या प्रकारानंतर इलाही महाजन यांनी भूम ठाण्यात उपरोक्त चौघांविरुद्ध मारहाण व धमकीची तक्रार मंगळवारी दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.

Web Title: Why not sell the land to the mother-in-law