शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

साडूभाऊंच्या हाती आता कोणाचे ‘घड्याळ’?; जावई टोपे, तनपुरेंच्या भूमिकेकडे राज्याचे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2023 06:47 IST

प्राजक्त तनपुरे यांच्या अर्धांगिनी सोनाली तनपुरे यांनी समाजमाध्यमांवर खा. शरद पवार यांना पाठिंबा दर्शविणारा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

- चेतन धनुरेधाराशिव : धाराशिव ही राष्ट्रवादीतील तीन दिग्गज नेत्यांची सासुरवाडी आहे. एका जावयाने वेगळी चूल मांडून उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आता उरलेले दोन जावई काय भूमिका घेतात, आपल्या राजकीय गुरूंच्या आश्रयालाच राहतात की साडूभाऊंना टाळी देतात, याकडे धाराशिव जिल्ह्यासह राज्याचेही लक्ष लागले आहे. 

विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे व माजी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे राष्ट्रवादीतील तीन दिग्गज नेते. या सर्वांचीच सासुरवाडी धाराशिव जिल्ह्यातील आहे. अजित पवार यांची सासुरवाडी तेर असून, ते माजीमंत्री व राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्य राहिलेल्या डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या भगिनी सुनेत्राताईंचे मिस्टर. तर राजेश टोपे यांची सासुरवाडी उपळा. तेरपासून जवळच असलेल्या या उपळ्यातील पडवळ कुटुंबाचे ते जावई. प्राजक्त तनपुरे हे ढोकीतील देशमुख कुटुंबाचे जावई आहेत. तिघांचीही सासुरवाडी अवघ्या १५ किमीच्या परिघातील. त्यामुळे धाराशिवकरांसाठी तरी एकार्थाने हे तिघेही साडूभाऊच. आता यातील अजितदादांनी त्यांचे काका तथा राजकीय गुरू खा. शरद पवार यांची साथ सोडत भाजप-सेनेसोबत हातमिळवणी केली; मात्र त्यांचे साडूभाऊ राजेश टोपे व प्राजक्त तनपुरे यांनी मात्र अजूनही आपले पत्ते ओपन केले नाहीत.

सोनाली तनपुरे यांचा शरद पवारांना पाठिंबा प्राजक्त तनपुरे यांच्या अर्धांगिनी सोनाली तनपुरे यांनी समाजमाध्यमांवर खा. शरद पवार यांना पाठिंबा दर्शविणारा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. पाठोपाठ खा. अमोल कोल्हे यांनी शरद पवारांची बाजू घेतल्याने त्यांचे कौतुक केले. यातच मंगळवारी प्राजक्त तनपुरे यांनी अजितदादांची भेट घेतली; मात्र ती कशाबाबत घेतली, याविषयीच्या बातम्यांत तथ्य नसल्याचे सोनालीताईंनी जाहीर केले. यावरून तनपुरे कुटुंबाचा राजकीय कल लक्षात येत असला, तरी कालचा दिवस हा आज नसतो, हेही तितकेच खरे.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारRajesh Topeराजेश टोपेSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस