शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकाची बदली झाल्याचे कळताच विद्यार्थिनींनी फोडला टाहो तर पालकांनी ठोकले शाळेला कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 15:45 IST

बेंबळी येथील जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळेतील  शिक्षक भालचंद्र कोकाटे यांची बदली झाली आहे. कोकाटे यांना परत याच शाळेत आणावे या मागणीसाठी लहान मुलींनी शाळेत आज एकच टाहो फोडला.

ठळक मुद्देबेंबळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक भालचंद्र कोकाटे यांची समायोजनातून बदली झाली कोकाटे यांना परत याच शाळेत आणावे या मागणीसाठी विद्यार्थिनीनी शाळेत आज एकच टाहो फोडला.

उस्मानाबाद : तालुक्यातील बेंबळी येथील जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळेतील शिक्षक भालचंद्र कोकाटे यांची बदली झाली आहे. कोकाटे यांना परत याच शाळेत आणावे या मागणीसाठी विद्यार्थिनीनी शाळेत आज एकच टाहो फोडला. तर संतप्त पालकांनी दिवसभर शाळेत ठाण मांडून वार्षिक परीक्षा होईपर्यंत कोकाटे यांना शाळेवर घ्यावे अशी मागणी करून शाळा बंद केली.

बेंबळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक भालचंद्र कोकाटे यांची समायोजनातून बदली होणार असल्याचे समजल्यानंतर पालक व शालेय व्यवस्थापन समितिने त्यांची बदली करू नये अशी मागणी केली होती. मात्र, शिक्षण विभागाने कोकाटे यांची बदली केली. कोकाटे यांची बदली झाल्याचे समजताच विद्यार्थिनीना अश्रू अनावर झाले.

दुसरीकडे प्रशासनाने बदली न करण्याच्या निवेदनाची दखल न घेतल्याने संतप्त झालेल्या महिला पालकांनी शाळेला टाळे ठोकले. केंद्रप्रमुख शिंदे आल्यानंतर कुलूप उघडण्यात आले. मात्र, दिवसभर शाळेचे काम बंद होते. विद्यार्थिनीनी शिंदे यांना घेराव घालून कोकाटे सरांना परत शाळेत आणण्याची मागणी लावली. दरम्यान, प्रशासन मागणी मान्य करत नाही तोपर्यंत शाळा भरू देणार नसल्याचा इशारा शालेय शिक्षण समिती अध्यक्षा शोभा गायकवाड यांनी दिला आहे. वार्षिक परीक्षा होईपर्यंत कोकाटे यांना परत आणावे, शिक्षकांच्या रिक्त जागा भराव्यात अशी मागणी त्यांनी यावेळी केली. तसेच मागणी मान्य नाही झाली तर विद्यार्थिनींची सामुहिक टीसी काढण्याचा इशारा त्यांनी दिला.

टॅग्स :Teacherशिक्षकzp schoolजिल्हा परिषद शाळाStudentविद्यार्थीOsmanabadउस्मानाबाद