मंगरूळात मिरवणूक काढून कन्यारत्नाच्या जन्माचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:30 IST2021-02-14T04:30:02+5:302021-02-14T04:30:02+5:30

फोटो (१३-२) संतोष मगर तामलवाडी : मुलगा-मुलगी समान आहेत, अशा स्वरूपाच्या कितीही वल्गना केल्या जात असल्या तरी आजही जन्माचे ...

Welcome to the birth of Kanyaratna by taking out a procession in Mangrul | मंगरूळात मिरवणूक काढून कन्यारत्नाच्या जन्माचे स्वागत

मंगरूळात मिरवणूक काढून कन्यारत्नाच्या जन्माचे स्वागत

फोटो (१३-२) संतोष मगर

तामलवाडी : मुलगा-मुलगी समान आहेत, अशा स्वरूपाच्या कितीही वल्गना केल्या जात असल्या तरी आजही जन्माचे फारसे स्वागत हाेत नाही. स्वागत साेड, जगात येण्यापूर्वीच चिमुकलीस गर्भातच संपविणा-या प्रवृत्ती आजही समाजामध्ये आहेत. त्यामुळे आजही मुलींचा जन्मदर कमीच आहे. एकीकडे हे सर्व घडत असतानाच तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथील डाेंगरे कुटुंबियांने कन्यारत्नाचे जंगी स्वागत केले. पुढे फटाक्यांची आतषबाजी,बँड पथकाचा निनाद, बसस्थानक ते घरापर्यंत रस्त्यावर रांगाेळी अन् फुले अंथरून लाडलीला आपल्या घरी आणले.

मंगरुळ येथील डोंगरे कुटुंबियांना पहिलीच मुलगी झाली. त्यामुळे डोंगरे कुटुंबात आनंदाला पारावर राहिला नाही. डोंगरे कुटुंबातील सदस्यांनी मुलीला दवाखान्यातून गावात आणल्यानंतर मुलीच्या जन्मानिमित्त बसस्थानक ते घरापर्यंत रांगोळी व रस्त्यावर फुले अंथरून बॅन्ड पथकासह व फटाक्यांची आतषबाजी करीत गावातून मिरवणूक काढण्यात आली. एखाद्या लग्न सोहळ्याला लाजवेल अशा पद्धतीने चिमुकलीच्या स्वागताचा साेहळा पार पडला. या माध्यमातून डोंगरे कुटुंबियांनी गर्भातच मुलीस संपविणार्या समाजातील प्रवृत्तींना सणसणीत चपराक दिली. या साेहळ्यात किसन डोंगरे, अभिजीत डोंगरे, सागर दगडू डोंगरे, आई प्रणाली सागर डोंगरे,बप्पा डोंगरे, समाधान सरडे, आण्णा लबडे, पंचायत समिती सदस्य आण्णा सरडे, पोलीस पाटील लक्ष्मण माळी, तात्या खडांळकर, अविनाश डोंगरे, विकास सावंत, महेश खोपडे, संभाजी लबडे, सौरभ खोपडे, समीर शेख, वैभव डोंगरे, यशपाल लबडे, अनिल लबडे, हर्षवर्धन डोंगरे, अंगणवाडी सेविका उर्मिला कोरेकर, बालिका डोंगरे, शोभा जेटीथोर, रूकुबी मुलाणी, विजया ठाकरे, संगीता शिरगिरे, आरोग्य सेविका गडदे, पाटील, अर्चना डोंगरे, स्वाती डोंगरे अश्विनी डोंगरे, रेखा डोंगरे, सुप्रिया सरडे यांच्यासह नातेवाईक सहभागी झाले हाेते.

स्त्रीभ्रूण हत्येचे वाढत्या प्रमाणामुळे मुलींच्या जन्मदरात कमालीची तफावत निर्माण झाली आहे. परिणामी विवाहासाठी मुली मिळणे कठीण झाले आहे.

गर्भपात करणार्‍या अनेक घटना सध्या घडत असताना डोंगरे कुटुंबियांनी मुलगा किंवा मुलगी असा भेद भाव करण्यापेक्षा ते आपले मुल आहे, ती आपल्या घरची लक्ष्मी आहे. हा विचार करत या सर्व घटनेला छेद देण्याचा प्रयत्न केला आहे. या डोंगरे कुटुंबियांतील सदस्यांनी स्त्री जन्माचे थाटमाटात साजरा केला आहे..

Web Title: Welcome to the birth of Kanyaratna by taking out a procession in Mangrul

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.