हवामान खात्याचा अंदाज पुन्हा चुकला; पेरणी खोळंबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:21 IST2021-06-23T04:21:56+5:302021-06-23T04:21:56+5:30
उस्मानाबाद : यंदा १५ ते २० जूनरोजी राज्यात मान्सून हजेरी लावेल, असा, अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. मात्र, ...

हवामान खात्याचा अंदाज पुन्हा चुकला; पेरणी खोळंबली
उस्मानाबाद : यंदा १५ ते २० जूनरोजी राज्यात मान्सून हजेरी लावेल, असा, अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. मात्र, मात्र हवामान खात्याचा अंदाज चुकल्याने पेरणी खोळंबली आहे. सध्या केवळ १ लाख ८४ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पेरणीची टक्केवारी केवळ ३५ टक्के इतकी आहे. ज्या शेतकऱ्यांनी अल्पशा पावसावर पेरणी केली, ती पिके आता कोमेजू लागली आहेत.
मे महिन्यात जिल्ह्यातील विविध भागात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली होती. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही काही भागात
पाऊस झाला. तुळजापूर, उमरगा तालुक्यातील काही भागांत शेतकरी पेरणीचे धाडस करीत आहेत.
कृषी विभागाच्यावतीने ७५ ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्यााशिवाय पेरणी करू नये, असे आवाहन केले होते. मात्र, हवामान खात्याने १५ ते २० जूनदरम्यान राज्यात मान्सून हजेरी लावेल, असा अंदाज वर्तविला होता. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी १० ते १४ जूनदरम्यान पेरण्या आटोपून घेतल्या. मात्र पावसाने पाठ फिरविल्याने शेतकरी चिंतेत आहेत. यंदा कृषी विभागाच्यावतीने ५ लाख ३२ हजार ७३९ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले होते. यापैकी आजघडीला १ लाख ८४ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून, त्याची टक्केवारी ३५ इतकी आहे. अद्यापही ७५ टक्के क्षेत्रावरील पेरणी खोळंबली आहे.
तालुकानिहाय पेरणी व झालेला पाऊस
तालुका पाऊस मी.मी. पेरणी हेक्टर
उस्मानाबाद ७९. २ २२०.४३
तुळजापूर १२६.४ ६९५.६७
परंडा ७२.१ ३०.४९
भूम १३०.१ २८१.१५
कळंब १०२.९ ४३६.६०
उमरगा ७०.१ २०.१३
वाशी ९८.७ २७.३०
लोहारा ८७.७ १३४.९०
पीकनिहाय क्षेत्र सर्वसाधारण क्षेत्र झालेली पेरणी
सोयाबीन २४६०.०३ १३८८.९८
तूर ८८७.५१ १६४.५४
ज्वारी १९९.९८ ५.४८
मूग २३०.२७ ८४.६७
उडीद ४५०.५८ १४२.९६
मका २२३.२० ३०.६८
आतापर्यंत झालेला पाऊस -
सर्वात कमी पाऊस - ७० मि.मी. उमरगा तालुका
सर्वात जास्त पाऊस - १३० मि.मी. भूम तालुका
कोठे किती पेरणी (हेक्टरमध्ये)
अपेक्षित पेरणी क्षेत्र ५३२७.३९
आतापर्यंत झालेली पेरणी १८४६.६७
पावसाची स्थिती
अपेक्षित पाऊस ९३.१
झालेला पाऊस ९६.३
प्रतिक्रिया
जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस झाला होता. या अल्पशा पावसावरच १०्र जूनरोजी सोयाबीनची पेरणी करून घेतली आहे. पावसाअभावी पीक सध्या कोमेजू लागली आहेत.
इरप्पा उकरंडे, शेतकरी, अरळी बु.
मागील दहा-पंधरा दिवसांपूर्वी सलगरा भागात दमदार पाऊस झाला. त्यामुळे गावातील ८० टक्के शेतकऱ्यांनी पेरणी करून घेतली. पेरणी होऊन दहा ते पंधरा दिवसांचा कालावधी लोटला आहे. पेरणीनंतर पावसाने उघडीप दिल्याने सोयाबीन पीक कोमेजू लागले आहे.
सतीश स्वामी, शेतकरी, सलगरा दि.
अल्पशा पावसावर पेरणी उरकून घेतली आहे. सोयाबीनचे पीक चांगले आहे. आता पावसाची प्रतीक्षा आहे. पावसानंतर तूर व उडीद पिकाची लागवड करायची आहे. बाजारात खत व बियाणांचे दर गगनाला भिडले आहेत. त्याचा फटका शेतकरी वर्गाला बसत आहे.
अमोल मोरे, शेतकरी, पाटोदा