शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

जलसंधारणातून कोरेगाव बनले पाणीदार; लोकसहभागातून केली ५० लाखांची कामे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 17:09 IST

कामे लोकसहभागातून केल्याने येथे पावसाळ्यातील पाणी टिकवून ठेवण्यात गावकऱ्यांना यश आले आहे़

- मारुती कदम 

उमरगा (जि़उस्मानाबाद) : एका बाजूला दुष्काळामुळे गावागावातील लोक हंडाभर पाण्यासाठी रानोमाळ भटकत असताना उमरगा तालुक्यातील कोरगाव मात्र, टंचाईपासून कोसो दूर आहे़ ही किमया गावाने साधलीय ती जलसंधारणातूऩ तब्बल ५० लाखांची कामे लोकसहभागातून केल्याने येथे पावसाळ्यातील पाणी टिकवून ठेवण्यात गावकऱ्यांना यश आले आहे़

कोरगाव हे साधारणत: २ हजार लोकवस्तीचे गाव़ शेती हा इथला मुख्य व्यवसाय़ गावाशेजारीच साठवण तलाव् झाल्याने शेती आणखीच समृद्ध झाली़ सुमारे १ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे़ असे असतानाही सातत्याने कमी होत असलेला पाऊस लक्षात घेऊन इथल्या गावकऱ्यांनी एकत्र येत गेल्या काही वर्षांत जलसंधारणाची कामे हाती घेतली़ प्रकाश लवटे, लता बंडगर, दिलीप पांढरे, मनोहर बंडगर, सरपंच संजय बंडगर, उपसरपंच विश्वजीत खटके यांनी पुढाकार घेतला. सुमारे ५० लाख रुपयांची कामे करण्यात आली आहे़ गावाभोवलातून वाहणाऱ्या नाल्याचे सरळीकरण, खोलीकरण झाल्याने पावसाचे पाणी जागीच जिरविण्यात यश आले़ त्यामुळे पाणीपुरवठ्याच्या विहिरीची व बोअरची पातळी चांगलीच वाढली आहे 

परिणामी, आज सगळीकडे टंचाईच्या झळा बसत असतानाही कोरेवाडीत मात्र पाण्यासाठी वणवण दिसत नाही़ अगदी घरापर्यंत नळाने पाणी देण्यासाठी ग्रामस्थ विठ्ठल बंडगर यांनी दान दिलेल्या जागेत विहीर घेण्यात आली़ त्यासही मुबलक पाणी आहे़ आता पााणीपातळी खोलावत असल्याने शेजारच्या बोअरचे पाणी त्यात सोडले जात आहे़ हे पाणी नियमितपणे गावकऱ्यांना नळाद्वारे मिळते़ शिवाय, गावात तीन ठिकाणी सार्वजनिक जलकुंभ उभारुनही सोय करण्यात आली आहे़  इतकेच नव्हे सहा लाख रुपये खर्च करुन ग्रामपंचायतीने आरओ प्लांट उभारला आहे़ यातून नागरिकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी अल्पदरात दिले जात आहे़ 

मुख्यमंत्र्यांनीही केले अभिनंदऩ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ९ मे रोजी दुष्काळी भागातील सरपंचाशी संवाद साधला़ यावेळी त्यांनी कोरगावचे सरपंच संजय पाटील यांच्याकडून दुष्काळाची माहिती घेतली़ पाटील यांनी गावात पाण्याच सुकाळ असल्याचे सांगताच मुख्यमंत्र्यांनीही संपूर्ण गावाचे अभिनंदन केल्याचे पाटील यांनी सांगितले.

भारनियमनाचा अडसर  कोरेगाव शिवारात मुबलक पाणी उपलब्ध आहे़ त्यामुळे गावाचीओळख पाणीदार, अशी झाली आहे़ ग्रामस्थांना पुरविण्यासाठी आमच्याकडे भरपूर पाणी असले तरी त्यासाठी उच्च दाबाने वीज मिळत नसल्याने अडचण होत असल्याचे उपसरपंच विश्वजीत खटके यांनी सांगितले़

टॅग्स :droughtदुष्काळWaterपाणीOsmanabadउस्मानाबाद