रस्ता दुरुस्तीसाठी दिला आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:36 IST2021-08-20T04:36:56+5:302021-08-20T04:36:56+5:30

याबाबत मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, या मागार्वर अजिंठा नगर ही मागासवर्गीय वस्ती असून, रस्त्याच्या दुरवस्थेमुळे ये-जा करणे अवघड ...

A warning of agitation for road repairs | रस्ता दुरुस्तीसाठी दिला आंदोलनाचा इशारा

रस्ता दुरुस्तीसाठी दिला आंदोलनाचा इशारा

याबाबत मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, या मागार्वर अजिंठा नगर ही मागासवर्गीय वस्ती असून, रस्त्याच्या दुरवस्थेमुळे ये-जा करणे अवघड झाले आहे. वाहन चालकांना वाहने चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. पादचाऱ्यांना देखील खड्ड्यांमधून वाट शोधावी लागत आहे. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने रस्त्याला तलावाचे स्वरूप येेते. याच मार्गावरून स्मशानभूमिकडे अंत्ययात्रा जातात.

या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी बहुजन एकता परिषद मागील तीन-चार वर्षांपासून पाठपुरावा करीत आहे. परंतु, प्रशासनाकडून अद्याप कुठलीच कार्यवाही झाली नाही. त्यामुळे याचे त्वरित डांबरीकरण करावे अन्यथा बहुजन एकता विकास परिषद तसेच अजिंठा नगर भागातील रहिवाशांच्या वतीने पालिकेसमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. यावर उमेश सिरसाठे, गौतम दिलपाक, प्रशांत बनसोडे आदींच्या सह्या आहेत.

Web Title: A warning of agitation for road repairs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.