कळंबमध्ये आजपासून प्रभागनिहाय लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:23 IST2021-06-18T04:23:34+5:302021-06-18T04:23:34+5:30

या मोहिमेंतर्गत १८ जून रोजी न. प. इमारत, जुन्या पोस्ट ऑफिसजवळ चोंदे गल्ली, १९ रोजी विठ्ठल मंदिर सभागृह, २१ ...

Ward wise vaccination from today in Kalamb | कळंबमध्ये आजपासून प्रभागनिहाय लसीकरण

कळंबमध्ये आजपासून प्रभागनिहाय लसीकरण

या मोहिमेंतर्गत १८ जून रोजी न. प. इमारत, जुन्या पोस्ट ऑफिसजवळ चोंदे गल्ली, १९ रोजी विठ्ठल मंदिर सभागृह, २१ रोजी अण्णा भाऊ साठे समाजमंदिर साठेनगर, २२ राेजी संतसेना महाराज मंदिर गांधीनगर, २३ राेजी कामगार कल्याण केंद्र महादेव मंदिरजवळ पुनर्वसन सावरगाव, २४ व २५ जून राेजी न. प. सार्वजनिक वाचनालय इमारत, तर २६ रोजी मोहारोडवरील शुभ मंगल कार्यालयात लसीकरण होणार आहे.

यामध्ये नियोजित दिवशी दोनशे नागरिकांना डोस देण्यात येणार आहेत. ४५ वर्षांवरील नागरिक, आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर यांना कोविशिल्ड लसीचा पाहिला डोस तसेच ज्या लाभार्थ्यांना कोविशिल्ड पाहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झाले आहेत त्यांना या मोहिमेंतर्गत लस दिली जाणार आहे.

या मोहिमेमध्ये ६० वर्षांवरील नागरिकांना आणि ४५ वर्षांवरील दिव्यांगांना प्राधान्याने लस दिली जाणार आहे. त्यामुळे इतरांनी लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये, असे आवाहनही आरोग्य विभागाने केले आहे. लसीकरणासाठी ऑनलाइन नोंदणीची गरज नसून या केंद्रावरच थेट लस देण्यात येणार आहे.

Web Title: Ward wise vaccination from today in Kalamb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.