मारहाणीतील वाँटेड जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:44 IST2021-01-08T05:44:12+5:302021-01-08T05:44:12+5:30
४६८ वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उस्मानाबाद : नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना शिस्त लागावी, यासाठी जिल्ह्यातील १८ पोलीस ठाणी व वाहतूक शाखेच्या ...

मारहाणीतील वाँटेड जेरबंद
४६८ वाहनचालकांवर कारवाईचा बडगा
उस्मानाबाद : नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना शिस्त लागावी, यासाठी जिल्ह्यातील १८ पोलीस ठाणी व वाहतूक शाखेच्या वतीने धडक मोहीम राबविली जात आहे. रविवारी जिल्ह्यातील विविध मार्गावर वाहतूक नियम मोडल्याप्रकरणी ४६८ वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाईचा बडगा उगारण्यात आला. या वाहनचालकांकडून १ लाख ७ हजार रुपयांचे तडजोड शुल्क वसूल करण्यात आले.
दारू अड्ड्यावर धाड; एकाविरुद्ध गुन्हा दाखल
उस्मानाबाद : उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने ३ जानेवारी रोजी तालुक्यातील सारोळा येथील अवैध दारू अड्ड्यावर धाड टाकली. यात सारोळा येथील सविता गायकवाड यांच्या पत्राशेडमध्ये १० लिटर अवैध गावठी दारू आढळून आली. पोलीस पथकाने अवैध मद्य जप्त करून संबंधिताविरुद्ध महाराष्ट्र दारू बंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.
दुचाकीच्या धडकेत पादचारी गंभीर जखमी
उस्मानाबाद : तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ येथील हरिश्चंद्र बंडगर हे ३ जानेवारी रोजी सिंदफळ शिवारातील तुळजापूर- सोलापूर रस्त्याने पायी जात होते. यावेळी गावातीलच चालक प्रवीण डोंगरे याने दुचाकी एमएच- २५ एक्यू- १८६१ निष्काळजीपणे चालवून बंडगर यांना जोराची धडक दिली. या अपघातात बंडगर हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर दुचाकीचालक घटनास्थळावरून पसार झाला. याप्रकरणी हरिश्चंद्र बंडगर यांचा भाऊ गोपाळ बंडगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.