वाशी नगरपंचायतीस धस यांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:35 IST2021-08-19T04:35:55+5:302021-08-19T04:35:55+5:30

आ. सुरेश धस यांनी मुख्याधिकारी गिरीश पंडित यांच्यासह नगर पंचायतचे माजी पदाधिकारी व भाजपाचे पदाधिकारी यांच्यासमवेत बैठक घेतली. ...

Visit to Vashi Nagar Panchayat | वाशी नगरपंचायतीस धस यांची भेट

वाशी नगरपंचायतीस धस यांची भेट

आ. सुरेश धस यांनी मुख्याधिकारी गिरीश पंडित यांच्यासह नगर पंचायतचे माजी पदाधिकारी व भाजपाचे पदाधिकारी यांच्यासमवेत बैठक घेतली. यावेळी पंतप्रधान घरकूल आवास योजनेचे काम योग्य पध्दतीने राबवून गरजू लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळवून दिल्याबद्दल तसेच मनरेगा योजनेअंर्तगत वैयक्तिक लाभाच्या योजनेचा आराखडा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आयुक्तांकडे पाठविणारी पहिली नगर पंचायत ठरल्याबद्दल पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले. यावेळी आमदार सुरेश धस यांनी नगर पंचायतला ऑक्सिमीटर भेट दिले.

याप्रसंगी मुख्याधिकारी गिरीश पंडित, माजी नगराध्यक्ष नितिन चेडे, नागनाथ नाईकवाडी, माजी उपनगराध्यक्ष प्रसाद जोशी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितिन काळे, माजी जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, तालुकाध्यक्ष सचिन इंगोले, बाळासाहेब सुकाळे, मकरंद शिंगणापुरे, भागवत कवडे, सुंदर उघडे, राजगुरू कुकडे, अमोल केळे, बळवंत कवडे, गोपीनाथ घुले, रंगनाथ शेरकर यांचेसह नागरिक उपस्थित होते.

Web Title: Visit to Vashi Nagar Panchayat