माेटार वाहन कायद्याचे केले उल्लंघन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:37 IST2021-08-20T04:37:32+5:302021-08-20T04:37:32+5:30
जुगारअड्ड्यावर छापा, एकाविरूद्ध गुन्हा उस्मानाबाद - कळंब शहरातील रंगीला चाैकातील जुगारअड्ड्यावर पाेलिसांनी १८ ऑगस्ट राेजी अचानक छापा मारला. या ...

माेटार वाहन कायद्याचे केले उल्लंघन
जुगारअड्ड्यावर छापा, एकाविरूद्ध गुन्हा
उस्मानाबाद - कळंब शहरातील रंगीला चाैकातील जुगारअड्ड्यावर पाेलिसांनी १८ ऑगस्ट राेजी अचानक छापा मारला. या कारवाईत जुगाराच्या साहित्यासह राेख ९२० रूपये जप्त करण्यात आले. या प्रकरणी कळंब पाेलीस ठाण्यात रणजित हारकर (रा.शिवाजी नगर, कळंब) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील घटनेचा अधिक तपास पाेलीस करीत आहेत.
बेडगा शिवारात दारूअड्ड्यावर कारवाई
उस्मानाबाद -उमरगा तालुक्यातील बेडगा शिवारात गावठी दारूचा अड्डा असल्याची गुप्त माहिती पाेलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पाेलिसांनी १८ ऑगस्ट राेजी अचानक छापा मारला. याकारवाईत गावठी दारू तयार करण्यासाठीचे १८० लिटर द्रव पदार्थ व १५ लिटर गावठी दारू जप्त केली. या प्रकरणी पथकाने संजय पवार, बालाजी जमादार, खलील जमादार (तिघे, रा. डिग्गी), गुलाब राठाेड (रा. हाेलूर तांडा) व राजेंद्र गणपती माने यांच्याविरूद्ध उमरगा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी पाेलिसांनी दारू तयार करण्यासाठीचे द्रवपदार्थ घटनास्थळीच नष्ट केले.