कोविड नियमांचे उल्लंघन, चौघांवर गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:31 IST2021-04-06T04:31:51+5:302021-04-06T04:31:51+5:30
तामलवाडी येथे अलिम पिरजादे यांनी ४ एप्रिल रोजी जनता कर्फ्यूचे उल्लंघन करून दुकान-हॉटेल व्यवसायसाठी चालू ठेवण्याचे तामलवाडी पोलिसांना आढळून ...

कोविड नियमांचे उल्लंघन, चौघांवर गुन्हे
तामलवाडी येथे अलिम पिरजादे यांनी ४ एप्रिल रोजी जनता कर्फ्यूचे उल्लंघन करून दुकान-हॉटेल व्यवसायसाठी चालू ठेवण्याचे तामलवाडी पोलिसांना आढळून आले. त्यांच्याविरुद्ध तामलवाडी ठाण्यात गुन्हा नोंद झाला. परंडा पोलीस ठाण्याचे पथक रविवारी शेळगाव येथे गस्तीवर असताना, त्यांना मनोज गायकवाड यांनी चहाचे हॉटेल व्यवसायास उघडे ठेवल्याचे निदर्शनास आले. गायकवाड यांच्याविरुद्ध परंडा ठाण्यात गुन्हा दाखल झाला. शिराढोण येथील अमोल वाघमारे याने ग्राहक सेवा केंद्र सुरु ठेवल्याचे शिराढोण पोलिसांना आढळून आल्याने त्यांच्याविरुद्ध शिराढोण ठाण्यात गुन्हा नोंदविला. उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथक आळणी फाटा परिसरात गस्तीवर होते. यावेळी बळीराम पाटील यांनी खानावळीत मानवी जीवितास धोका होईल, अशा पद्धतीने अग्नी प्रज्वलित केल्याचे नजरेस पडले. त्यांच्याविरुद्ध ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद झाला.