VIDEO - तुळजाभवानी मंदिरात घटस्थापनेने नवरात्रोत्सवास प्रारंभ
By Admin | Updated: October 1, 2016 17:11 IST2016-10-01T17:11:46+5:302016-10-01T17:11:46+5:30
महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवास शनिवारी घटस्थापनेने प्रारंभ झाला.

VIDEO - तुळजाभवानी मंदिरात घटस्थापनेने नवरात्रोत्सवास प्रारंभ
tyle="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
उस्मानाबाद, दि. १ - महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवास शनिवारी घटस्थापनेने प्रारंभ झाला. पहाटे दीड वाजता देवीची मंचकी निद्रा संपूर्ण मूर्तीची सिंहासनावर पूर्ववत प्रतिष्ठापना करण्यात आली. यानंतर पहाटे चार वाजेपर्यंत विशेष अभिषेक पार पडले.
सकाळी अकरा वाजेच्या सुमारास मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या उपस्थितीत अंगारा विधी पार पडल्यानंतर नारनवरे दाम्पत्याच्या हस्ते मंदिरातील गोमुख तीर्थाजवळ तिन्ही घटकलशांचे पूजन करण्यात आले. येथून हे कलश वाजत-गाजत मंदिरातील मुख्य गाभाºयात आणून येथे घटस्थापना करण्यात आली.
यानंतर मंदिर परिसरातील खंडोबा, येमाई, मातंगी आदी उपदेवतांच्या मंदिरातही घटस्थापना करण्यात आली. या घटस्थापनेनंतर धुपारती होवून पारंपारिक पध्दतीने अंगारा काढण्यात आला. यावेळी नवरात्रोत्सव कालावधीत पार पडणाºया विविध धार्मिक कार्यक्रमांसाठी ब्रह्मवृंदास अनुष्ठानाची वर्णी देण्यात आली.