शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाइन गेम्सचे बळी! कर्जबाजारी तरुणाने पत्नी, मुलास विष पाजून स्वत:ला संपवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 13:10 IST

शेती विकली, घर विकले तरी कर्जाच्या फेरा सुटत नसल्याने टोकाचे पाऊल

धाराशिव : डोक्यावर झालेला कर्जाचा डोंगर, फेडण्यासाठी पाठीशी काहीच शिल्लक नसल्याने नैराश्यात रुतलेल्या बावी येथील लक्ष्मण मारुती जाधव (वय ३०) या तरुणाने पत्नी तेजस्विनी व दोन वर्षीय मुलगा शिवांश यांना विष पाजून स्वत: गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी ११ वाजता उघडकीस आली. ऑनलाइन गेम्स तसेच शेअर मार्केटमध्ये नुकसान होऊन कर्ज झाल्याचा दावा त्याच्या आप्तेष्टांकडून करण्यात आला. मात्र, पोलिसांनी त्याची पुष्टी केली नाही. तसा कयास असल्याचे स्पष्ट केले.

धाराशिव तालुक्यातील बावी येथील लक्ष्मण जाधव हा तरुण आपली पत्नी तेजस्विनी व शिवांश यांच्यासह पत्र्याच्या शेडमध्ये वास्तव्याला होता. लक्ष्मण हा जेसीबी, ट्रॅक्टरवर चालक म्हणून काम करीत कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवीत होता. रविवारी रात्री नेहमीप्रमाणे हे कुटुंब एकत्र झोपले होते. दरम्यान, सोमवारी सकाळचे ११ वाजले तरी घरातून काही आवाज येत नव्हता. दारही उघडले नव्हते. लक्ष्मण बाहेर न आल्याने त्याच्या काही मित्रांनी घराकडे धाव घेतली. मात्र, आतून कडी लावलेली असल्याने व कसलाही प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी तातडीने ही बाब पोलिसांना कळवली. पोलिस अधीक्षक रितू खोकर, ग्रामीण ठाण्याचे पोलिस निरीक्षक मारोती शेळके हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धावले. त्यांनी दार उघडून पाहणी केली असता तेजस्विनी व शिवांश बेडवर निपचित तर लक्ष्मण गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. या तिघांचेही मृतदेह एका वाहनातून पोलिसांनी धाराशिवच्या वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनासाठी दाखल केले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत जबाब घेण्याचे काम ग्रामीण पोलिसांकडून सुरू होते.

मन हेलावून टाकणारे दृश्यपोलिसांनी दार उघडून आत प्रवेश केल्यानंतर तेजस्विनी व शिवांश हे बेडवर निपचित पडले होते. त्यांच्या तोंडातून फेस आला होता, तर लक्ष्मण हा आडूला गळफास घेतलेला दिसून आला. हे दृश्य पाहिल्यानंतर नातेवाइकांनी हंबरडा फोडला.

अडीच वर्षांपूर्वी केला प्रेमविवाहलक्ष्मण जाधव याचे गावातीलच तेजस्विनीसोबत प्रेम जुळले होते. यातूनच अडीच वर्षांपूर्वी त्यांनी प्रेमविवाह केला होता. यानंतर हे दोघे प्लॉटमध्ये पत्र्याचे शेड तयार करून त्यात वास्तव्य करीत होते. त्यांच्या संसारवेलीवर शिवांशरूपी फूल दोन वर्षांपूर्वीच उमलले.

शेती विकून फेडले २० लाख रुपयेलक्ष्मणवर मोठ्या प्रमाणात कर्ज झाले होते. त्याच्या वाट्याला आलेले जवळपास चार एकर शेत विकून त्याने २० लाख रुपयांची परतफेड केली होती. पुन्हा कर्ज झाल्याने राहत्या प्लॉटचाही पाच लाखांत सौदा केला होता. तरीही कर्जाच्या फेरा सुटत नसल्याने त्याने टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा आहे.

प्रथमदर्शनी मयत तरुणाने पत्नी व मुलास विष देऊन आत्महत्या केल्याचे स्पष्ट होत आहे. प्राथमिक माहितीनुसार ऑनलाइन गेम्स, शेअर मार्केटमध्ये नुकसान झाल्याचे त्याचे आप्तेष्ट सांगत आहेत. मात्र, आम्ही त्याची या क्षणाला पुष्टी करीत नाही. तपासाअंतीच यातील खरे कारण समोर येऊ शकेल.- मारोती शेळके, पोलिस निरीक्षक, धाराशिव ग्रामीण

टॅग्स :dharashivधाराशिवDeathमृत्यूfarmer suicideशेतकरी आत्महत्या