शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वऱ्हाडाची जीप ट्रॅक्टरवर आदळली; दोन ठार, पंधरा जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 19:59 IST

अपघातात वऱ्हाडी घेऊन निघालेल्या जीपमधील दोघे मृत्यूमुखी पडले़

ठळक मुद्देचार वाहनांचा विचित्र अपघात जखमीतील आणखी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे़

उमरगा/बलसूर : सोलापूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावरील जकेकूरनजिक गुरुवारी सकाळी चार वाहनांचा विचित्र अपघात झाला़ या अपघातात वऱ्हाडी घेऊन निघालेल्या जीपमधील दोघे मृत्यूमुखी पडले़ तर पंधराजण जखमी झाले आहेत़

मंद्रुप (जि़सोलापूर) येथील चंद्रकांत ख्याडे यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यासाठी गुरुवारी सकाळी दोन जीप कर्नाटकातील बसवकल्याणकडे निघाल्या होत्या़ एकामागोमाग निघालेल्या यातील एक जीप (क्ऱएम.एच. १३ डीई ५७२७) सोलापूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावरील जकेकूर येथे समोरुन विरुद्ध दिशेने येत असलेल्या ट्रॅक्टरवर (क्ऱ एम.एच. २५/५९११) जाऊन आदळली़ त्याच क्षणी या जीपच्या पाठीमागे असलेली दुसरी जीपही (क्ऱ के.ए.२९ एम.२७११) या अपघातग्रस्त वाहनांवर आदळली़ यापाठोपाठ प्रवासी घेवून निघालेला एक ऑटोरिक्षाही या वाहनांवर येऊन आदळला़

या विचित्र अपघातात जीपमधील वऱ्हाडी लक्ष्मण भिमप्पा नांदणीकर (वय ५२, रा. आयनापूर, जि. बेळगाव) हे जागीच ठार झाले़ तर गंभीर जखमी गुरूनाथ मलाकरी लच्चाने (वय ५८, रा. मंद्रुप, जि. सोलापूर) यांना उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयात मयत घोषित करण्यात आले़ दरम्यान, याच अपघातात वऱ्हाडी जीपमधील गुरूनाथ सिद्धलिंग माळी, श्रीशैल्य अमोक्षित कुंभार, गौरीशंकर भगवान सुतार, कन्नाप्पा विठ्ठल धुळखेडे, आप्पाशा सिद्राम लोभे, जगदेव विठ्ठल धूळखेडे, महादेव सुर्याप्पा शेळे, मळसिद्ध विरप्पा मुगळे, शिवानंद कल्लप्पा नंदुरे (सर्व रा. मंद्रुप  जि. सोलापूर), रमेश जिवाप्पा कांबळे (रा. विंचूर  जि. सोलापूर), दुर्योधन महादेव नांदणीकर (रा. आयनापूर, जि़बेळगाव) हे अकरा जण जखमी झाले आहेत़ तर ऑटोरिक्षातील लतिफ रहेमान मातोळे, रियाज जिलानी जमादार, संतोष गणेश जाधव, मानव दत्ता गायकवाड (सर्व रा़ जकेकूर, ता. उमरगा) हे चौघे गंभीर जखमी झाले़ सर्वच जखमींना पुढील उपचारासाठी सोलापूरला पाठविण्यात आले आहे़ दरम्यान, या जखमीतील आणखी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे़

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूOsmanabadउस्मानाबाद