मासिक पाळीतही घेता येईल लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:34 IST2021-05-07T04:34:28+5:302021-05-07T04:34:28+5:30

एप्रिल महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग फैलावू लागला आहे. प्रतिदिन ६०० ते ८०० रुग्णांची भर पडतेय. त्यामुळे या काळात प्रत्येक ...

The vaccine can also be taken during menstruation | मासिक पाळीतही घेता येईल लस

मासिक पाळीतही घेता येईल लस

एप्रिल महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग फैलावू लागला आहे. प्रतिदिन ६०० ते ८०० रुग्णांची भर पडतेय. त्यामुळे या काळात प्रत्येक व्यक्ती खबरदारी घेतोय, कोरोनाच्या संसर्गापासून संरक्षण मिळविण्यासाठी अनेक जणांचा कोविड लस घेण्याकडे कल वाढला. १ एप्रिलपासून ४५ वर्षांपुढील नागरिकांनाच केवळ लस मिळत होती. ३ मेपासून १८-४४ वयोगटातील व्यक्तींना लस दिली जात आहे. या कालावधीत महिलाही मोठ्या संख्येने लस घेत आहेत. मात्र मासिक पाळी व गर्भवतींनी कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी का, असे प्रश्न महिलावर्गातून उपस्थित होत आहेत. याबाबत लोकमतने तज्ज्ञांचे मत जाणून घेतले असता, त्यांनी मासिक पाळी वेळीही लस घेण्यास हरकत नाही. तसेच गर्भवती महिलांनी मात्र डोस घेऊ नये, असे सांगितले.

स्त्री रोगतज्ज्ञ काय म्हणतात?

जिल्ह्यात ३ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना लस दिली जात आहे. ज्या १८ वर्षांपुढील युवती, महिलांनी लसीकरणासाठी नोंदणी केली आहे, लसीकरणावेळीच मासिक पाळीही असेल तरी लस घेता येते. त्याचे शरीरावर दुष्परिणाम नाहीत. त्यामुळे मासिक पाळीत लस घेण्यास हरकत नाही. मात्र, गर्भवती महिलांना सध्या लस दिली जात नाही. त्यामुळे गर्भवती महिलांनी लस घेऊ नये.

- डॉ. स्मिता गवळी, वैद्यकीय अधीक्षक, जिल्हा स्त्री रुग्णालय

गाइडलाइन काय सांगतात?

लसीकरणासंदर्भातही शासनाने अगदी सुस्पष्ट असे दिशानिर्देश दिले आहेत.

मासिक पाळीत लस घेतली तरी कुठलाही अपाय होत नाही.

गरोदर अवस्थेत आणि बाळ सहा महिन्यांचे होईपर्यंत गरोदर मातांनी लस घेऊ नये.

राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने सुस्पष्ट निर्देश दिले असल्याने महिलांनी मासिक पाळीतही भीती न बाळगता लस घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

Web Title: The vaccine can also be taken during menstruation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.