गावातच झाली लसीकरणाची सोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:34 IST2021-04-09T04:34:33+5:302021-04-09T04:34:33+5:30
बलसूर : उमरगा तालुक्यातील कदेर येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची सोय नसल्यामुळे येथील ग्रामस्थांना उमरगा अथवा मुरूम केंद्रात जाऊन लसीकरण ...

गावातच झाली लसीकरणाची सोय
बलसूर : उमरगा तालुक्यातील कदेर येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची सोय नसल्यामुळे येथील ग्रामस्थांना उमरगा अथवा मुरूम केंद्रात जाऊन लसीकरण करून घ्यावे लागत होते. परंतु, आता येथील उपकेंद्रातच लसीकरण सुरू करण्यात आले. पहिल्याच दिवशी ११० नागरिकांनी याचा लाभ घेतला. यावेळी डॉ. विक्रम जीवनगे, सरपंच सतीश जाधव, पिंटू राठोड, माजी सरपंच जीवन चौधरी, तंटामुक्त समिती अध्यक्ष पी. डी. जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश बेंबळगे, आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी राजपूत, आरोग्यसेविका एम. एन. गुरव, एस. आय. मोरे, आरोग्यसेवक डी. ए. जाधव, एन. डी. सोलंकर, एस. एस. घोडके, ग्रामपंचायत कर्मचारी प्रशांत जाधव, भास्कर कदम यांची उपस्थिती होती. लसीकरण सुरळीत पार पाडण्यासाठी आशा स्वयंसेविका गीता वाघमारे, अनिता सुरवसे, अर्चना ढवळे, ज्योती सुरवसे आदी परिश्रम घेत आहेत.