बलसूर उपकेंद्रात लसीकरण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:32 IST2021-04-08T04:32:38+5:302021-04-08T04:32:38+5:30

उमरगा : येणेगूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या बलसूर उपकेंद्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जि. प. सदस्य प्रा. सुरेश बिराजदार ...

Vaccination started at Balsur sub-center | बलसूर उपकेंद्रात लसीकरण सुरू

बलसूर उपकेंद्रात लसीकरण सुरू

उमरगा : येणेगूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या बलसूर उपकेंद्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जि. प. सदस्य प्रा. सुरेश बिराजदार यांच्याहस्ते व उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरोना प्रतिबंधक लसीकरणास प्रारंभ करण्यात आला.

बलसूर आरोग्य उपकेंद्रांतर्गत बलसूरसह तीन तांडे, मल्लिकार्जुन वस्ती, कलदेव लिंबाळा, कडदोरा, समुद्राळ, व्हंताळ आदी गावांतील ग्रामस्थांना या लसीकरण केंद्राचा मोठा उपयोग होणार आहे. नागरिकांनी शंका न बाळगता लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रा. बिराजदार यांनी यावेळी केले. सायंकाळी चार वाजेपर्यंत येथे १२५ जणांना लसीकरण करण्यात आले. यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साळुंके, येणेगूरचे डॉ. जळकोटे, डॉ. गुंजोटे, गाडेकर, आरोग्य सेविका सोनाली सगर-पाटील, एस. ए. बरमदे, एस. घंटे, मीलन सुरवसे, अमोल जोशी यांच्यासह सरपंच राजश्री नांगरे, उपसरपंच सुरेश वाकडे, ग्रा. पं. सदस्य पवन पाटील, वागंबर सरवदे, आयुब पटेल, अतुल हिंगमिरे, विलास बिराजदार, अमर नांगरे, अक्षय पाटील, गिरीश गव्हाणे, माधव नांगरे, मालकुंजे, प्राचार्य कवलजित बिराजदार, प्रशांत वाकडे, माधव घोडके आदी उपस्थित होते.

Web Title: Vaccination started at Balsur sub-center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.