कोरोना प्रतिबंधासाठी लसीकरण अत्यावश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:21 IST2021-07-09T04:21:45+5:302021-07-09T04:21:45+5:30
उस्मानाबाद : कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी लसीकरण करणे आवश्यक आहे. त्यामुळे लसीकरण सत्राचे योग्य प्रकारे नियोजन करण्यात येत आहे. यासाठी ...

कोरोना प्रतिबंधासाठी लसीकरण अत्यावश्यक
उस्मानाबाद : कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी लसीकरण करणे आवश्यक आहे. त्यामुळे लसीकरण सत्राचे योग्य प्रकारे नियोजन करण्यात येत आहे. यासाठी स्थानिक, लोकप्रतिनिधी, शासकीय यंत्रणांची मदत घेण्यात यावी, अशी सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी केली. त्यांनी गुरुवारी पाेहनेर येथील आराेग्य केंद्रास भेट दिली.
उस्मानाबाद तालुक्यातील पाेहनेर येथील आराेग्य केंद्रास त्यांनी गुरुवारी भेट दिली. यावेळी ते बाेलत हाेते. त्यांच्यासमवेत जिल्हा आराेग्य अधिकारी डाॅ. एच. व्ही. वडगावे, वैद्यकीय अधिकारी डाॅ. पवार यांची प्रमुख उपस्थिती हाेती.
सीईओ गुप्ता म्हणाले की, कोविड लसीकरण करण्यासाठी आरोग्य यंत्रणेसोबत इतर शासकीय व अशासकीय संस्था देखील काम करत आहेत. ग्रामस्थांनीही कुठल्याही स्वरूपाच्या अफवांना बळी न पडता निर्धारित वेळेत लसीकरण करू घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले. जिल्ह्यातील ४४ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोविडच्या दुसऱ्या डोसच्या सत्राचे आयोजन केले होते. यापैकीच पोहनेर येथील लसीकरण सत्राच्या ठिकाणास भेट देऊन लाभार्थ्यांची माहिती घेऊन व यंत्रणांच्या तयारीची पाहणी गुप्ता यांनी केली. प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरातील स्वच्छता, रुग्णांना पाण्याची व्यवस्था, जाणीवजागृती, साहित्याचे प्रदर्शन, अभिलेख वर्गीकरण व वृक्षरोपणाचे काम, लसीकरणाच्या सुरक्षिततेची तयारी पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी आराेग्य कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित हाेते.