लसीकरण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:29 IST2021-04-14T04:29:57+5:302021-04-14T04:29:57+5:30
सोनारी : येथे मंगळवारपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झाले असून, दिवसभरात १३० जणांना लस टोचण्यात आली. या वेळी यशवंत ...

लसीकरण सुरू
सोनारी : येथे मंगळवारपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झाले असून, दिवसभरात १३० जणांना लस टोचण्यात आली. या वेळी यशवंत कदम, डॉ. प्रतीक दुगम, डॉ. सचिन कुटाळ, डॉ. रूपाली शिंदे, आशा कार्यकर्त्या राधा चौगुले व मेघा दुबळे आदी उपस्थित होते.
आमदारांची भेट
तामलवाडी : आ. प्राचार्य अशोक उईके यांनी यमगरवाडी येथील भटके विमुक्त प्रतिष्ठानच्या प्रकल्पास नुकतीच भेट दिली. या वेळी प्रतिष्ठानचे विजयकुमार वाघमारे यांनी या प्रकल्पाच्या कार्याची माहिती दिली. याप्रसंगी काटीचे सरपंच आदेश कोळी उपस्थित होते.
पाडवा साधेपणाने
(गुढीचा फोटो)
उस्मानाबाद : जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून, मंगळवारी साजऱ्या झालेल्या गुढीपाडवा सणावरदेखील कोरोनाचे सावट दिसून आले. नागरिकांनी पाडव्यानिमित्त कुठलीही खरेदी न करता घरातच थांबून हा सण साधेपणाने साजरा केला.
अवैध धंदे वाढले
उमरगा : तालुक्याच्या ग्रामीण भागात मटका, जुगार, अवैध दारू विक्री यासारखे धंदे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. यामुळे तरुण पिढी याच्या आहारी जात असून, पोलीस प्रशासनाने कारवाई करून हे धंदे बंद करावेत, अशी मागणी तालुकावासीयांमधून केली जात आहे.
कारवाईची मागणी
उस्मानाबाद : जिल्ह्यात कोरोना रुग्ण मोठ्या संख्येेने वाढत असतानादेखील अनेक नागरिक अजूनही फिजिकल डिस्टन्स, मास्क, सॅनिटायझरचा वापर याकडे दुर्लक्ष करीत आहेत. विनाकारण फिरणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. अशांवर कारवाईची मागणी केली जात आहे.