१८ ते ४४ वयोगटास ११ केंद्रांवर लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:33 IST2021-05-10T04:33:10+5:302021-05-10T04:33:10+5:30
१८ ते ४४ वयोगटांतील वर्ग कमविता असल्याने कामानिमित्त घराबाहेर राहावे लागते. या वयोगटांतील व्यक्ती मोठ्या संख्येने बाधित होत होते. ...

१८ ते ४४ वयोगटास ११ केंद्रांवर लस
१८ ते ४४ वयोगटांतील वर्ग कमविता असल्याने कामानिमित्त घराबाहेर राहावे लागते. या वयोगटांतील व्यक्ती मोठ्या संख्येने बाधित होत होते. तसेच यांच्याकडून लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांनाही संसर्ग होण्याचा धोका वाढत होता. त्यामुळे १८-४४ वयोगटांतील व्यक्तींना लस देण्याची मागणी पुढे येऊ लागली होती. शासनाने १ मे पासून या वयोगटास देण्याची घोषणा केली. जिल्ह्यात ३ मे पासून लसीकरणास सुरुवात झाली. मात्र, पहिल्या आठवड्यात केवळ पाच केंद्रावर लस दिली जात होती. सोमवारी केंद्राची संख्या वाढली असून, उस्मानाबादेतील जिल्हा रुग्णालय, उमरगा, तुळजापूर, कळंब, परंडा येथील उपजिल्हा रुग्णालय, लोहारा, वाशी, भूम, तेर, सास्तूर, मुरुम ग्रामीण रुग्णालयांचा समावेश आहे. कोविन पोर्टलवर ऑनलाईन स्लॉट बुकिंग केलेल्या लाभार्थ्यांनी लस घ्यावी, अन्य व्यक्तींनी केंद्रावर गर्दी करू नये, असे आवाहन लसीकरण अधिकारी डॉ. कुलदीप मिटकरी यांनी केले आहे.