गाेर सेनेचे जिल्हा कचेरीसमाेर उपाेषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:35 IST2021-08-19T04:35:51+5:302021-08-19T04:35:51+5:30

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण ठेवावे, वसंतराव नाईक तांडा वस्ती योजनेवर बंजारा समाजातील व्यक्तींची जिल्हाध्यक्ष म्हणून निवड करावी, मागासवर्गीय ...

Upasana at the District Offices of Gaer Sena | गाेर सेनेचे जिल्हा कचेरीसमाेर उपाेषण

गाेर सेनेचे जिल्हा कचेरीसमाेर उपाेषण

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण ठेवावे, वसंतराव नाईक तांडा वस्ती योजनेवर बंजारा समाजातील व्यक्तींची जिल्हाध्यक्ष म्हणून निवड करावी, मागासवर्गीय अधिकारी व कर्मचारी यांना पदोन्नतीत आरक्षण लागू करावे, नवी मुंबई विमानतळाला वसंतराव नाईक यांचे नाव देण्यात यावे, या प्रमुख मागण्यांसाठी गाेर सेनेच्यावतीने १७ ऑगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर उपाेषण सुरू करण्यात आले आहे. या आंदाेलनास बुधवारी जि. प. सदस्य प्रकाश चव्हाण यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शविला. केंद्र व राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांतील धाेक्यात आलेले ओबीसींचे आरक्षण कायम ठेवावे, अन्यथा राज्यभर आंदाेलन करू, असा इशारा त्यांनी दिला.

उपोषणास लक्ष्मण चव्हाण, हरिष जाधव, धनंजय शिंगाडे, गुलाब जाधव, राज राठोड, आबासाहेब खोत, सतीश कदम, डी. एम. कोळी, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शिंदे, मारुती पवार, सुरेश पवार आदींनी पाठिंबा दिला.

आंदाेलनात राजाभाऊ पवार, दिलीप जाधव, लखन चव्हाण, लालसिंग चव्हाण, दिलीप आडे, कुमार राठोड, राजू चव्हाण, शंकर राठोड, कालिदास चव्हाण, पिंटू चव्हाण, बालाजी राठोड, राजू दास राठोड, मोहन राठोड, मीराबाई राठोड आदी सहभागी झाले आहेत.

Web Title: Upasana at the District Offices of Gaer Sena