टाकळीच्या उपसरपंचपदी सूर्यवंशी बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:31 IST2021-02-13T04:31:50+5:302021-02-13T04:31:50+5:30

उस्मानाबाद : तालुक्यातील टाकळी (बें.) ग्रामपंचायतीचे उपसरपंच पीरसाब बाशुमीया शेख यांनी नुकताच राजीनामा दिला हाेता. नवीन उपसरपंच निवडीसाठी १२ ...

Unopposed with Suryavanshi as Deputy Panch of Takli | टाकळीच्या उपसरपंचपदी सूर्यवंशी बिनविरोध

टाकळीच्या उपसरपंचपदी सूर्यवंशी बिनविरोध

उस्मानाबाद : तालुक्यातील टाकळी (बें.) ग्रामपंचायतीचे उपसरपंच पीरसाब बाशुमीया शेख यांनी नुकताच राजीनामा दिला हाेता. नवीन उपसरपंच निवडीसाठी १२ फेब्रुवारी राेजी प्रक्रिया घेण्यात आली असता, महादेव सूर्यवंशी यांची बिनविराेध निवड झाली.

टाकळी ग्रामपंचायतीचे उपसरपंच शेख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला हाेता. त्यांच्या राजीनाम्यामुळे हे पद रिक्त झाले हाेते. त्यानुसार नूतन उपसरपंच निवडीसाठी १२ फेब्रुवारी राेजी निवडणूक निर्णय अधिकारी डी. डी. चिखले यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी ग्रामसेवक डी. पी. गुरव, तलाठी रोडगे, सरपंच आशाबाई दत्तात्रय सोनटक्के यांची उपस्थिती हाेती. दत्ता सोनटक्के यांच्या पॅनलची सध्या ग्रामपंचायतीत सत्ता आहे. त्यामुळे महादेव सूर्यवंशी यांची उपसरपंचपदी निवड होणार हे नक्की होते. मात्र, विरोधी पॅनलच्या पूजा ज्योतिराम जाधव यांनी ऐनवेळी फाॅर्म भरल्याने निवडणूक प्रक्रियेत रंगत आली. मात्र, पूजा जाधव यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे महादेव सूर्यवंशी यांची बिनविरोध निवड घाेषित करण्यात आली. निवडीनंतर त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी दत्ता सोनटक्के, सरपंच आशाबाई सोनटक्के, प्रा.राजा जगताप,पीरसाहेब शेख,वर्धमान शीरगीरे,श्रीमंत सोनटक्के,काकासाहेब पाटील, प्रताप गायकवाड, ज्योतीराम जाधव, रब्बानी शेख,आदम शेख, काकासाहेब सोनटक्के, रंगाना पवार, बाबाराव सोनटक्के आदी उपस्थित हाेते.

Web Title: Unopposed with Suryavanshi as Deputy Panch of Takli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.