कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या शाळा, मुलांचं होत असलेलं शैक्षणिक नुकसान तसेच ग्रामीण भागातील पालकांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून, राजुरी सामाजिक बांधीलकीचे भान असलेल्या तरुणांनी अशा विद्यार्थ्यांसाठी वही महाेत्सव घेण्याचा निर्णय घेतला हाेता. यासाठी लागणारे पैसे लाेकवर्गणीच्या माध्यमातून जमा केले. या पैशांतून गावांतील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या २५० विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या वह्या भेट म्हणून देण्यात आल्या. यात चाररेघी, दोनरेघी, एकरेघी, चौकट तसेच चित्रकला, रजिस्टर, पेन, पेन्सिल, रंग, खडू इत्यादी शैक्षणिक साहित्याचा समावेश हाेता. हे साहित्य विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर म्हणून देण्यात आले. विशेष म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्याने, विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत जाऊन, गावातील संवेदनशील तरुणांनी, वह्या आणि इतर शैक्षणिक साहित्यांची मदत पोहोच केली. यावेळी गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील, शालेय समितीचे अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक आणि आयोजक तरुण उपस्थित हाेते.
लोकवर्गणीमधून तरुणांनी साजरा केला अनोखा वही महाेत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:37 IST