शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीसोबतचे अनैतिक संबंध उघड; बॉयफ्रेंडने पतीला संपवलं, म्हणाला मी नसते मारले तर... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2023 19:49 IST

पत्नीशी आरोपीचे संबंध असल्याचे मृत तरुणास होते माहीत

वाशी (जि. उस्मानाबाद) : कळंब तालुक्यातील ईटकूर येथील राहुल रणजित फरताडे (२७) या तरुणाचा अनैतिक संबंधातून मांडवा शिवारात खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीस वाशी पोलिसांनी गजाआड केले असून, त्याने खुनाची कबुलीही दिली आहे.

राहुल हा ३० जूनच्या रात्री पार्टीसाठी म्हणून बाहेर गेला होता. रात्री उशिरापर्यंत तो परतला नाही. दरम्यान, ११ वाजण्याच्या सुमारास राहुल याचा मृतदेह मांडवा शिवारात पडला असल्याचा फोन त्याच्या वडिलांना आला. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पाठोपाठ वाशी पोलिसही तेथे पोहोचले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह वाशीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. या घटनेप्रकरणी राहुलचे वडील रणजित फरताडे यांच्या तक्रारीवरून अज्ञातावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. वाशी ठाण्याचे सहायक निरीक्षक राजकुमार ससाणे यांनी लागलीच तपास सुरू केला तेव्हा हा खून अनैतिक संबंधातून झाल्याचे समोर आले. संशयावरून मृत राहुल याची पत्नी व ईटकूर येथीलच सुरेश दादाराव फरताडे यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता, सुरेश फरताडे याने खून केल्याची कबुली दिली.

....म्हणे राहुलच करणार होता खूनआरोपी सुरेश फरताडे याने चौकशीत राहुल हाच आपला खून करणार होता, अशी माहिती पोलिसांना दिली. त्याच्या पत्नीशी आपले अनैतिक संबंध असल्याचे राहुलला माहीत झाले होते. यामुळे त्याच्याआधी आपणच काटा काढण्याचे ठरविले. शुक्रवारी त्यावर लक्ष ठेवत मांडवा शिवारात एकटे गाठून खून केल्याचीही माहिती आरोपीने दिल्याचे वाशी पोलिसांनी सांगितले.

नातेवाइकांचा आक्रमक पवित्राराहुल फरताडे याचा खून झाल्याचे समजल्यानंतर नातेवाइकांनी आरोपीला ताब्यात घेतल्याशिवाय मृतदेह स्वीकारणार नाही, असा पवित्रा शनिवारी घेतला होता. दुपारी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्याचे सांगितल्यानंतर नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीOsmanabadउस्मानाबाद