उमाकांत माने यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:22 IST2021-06-20T04:22:17+5:302021-06-20T04:22:17+5:30

उमरगा : कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी माउली प्रतिष्ठान अंतर्गत कोविड सेंटर चालविल्याबद्दल प्रतिष्ठानचे अध्यक्ष उमाकांत माने यांचा भाजपच्या वतीने सत्कार ...

Umakant Mane felicitated | उमाकांत माने यांचा सत्कार

उमाकांत माने यांचा सत्कार

उमरगा : कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी माउली प्रतिष्ठान अंतर्गत कोविड सेंटर चालविल्याबद्दल प्रतिष्ठानचे अध्यक्ष उमाकांत माने यांचा भाजपच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी स्पर्श रुग्णालयाचे प्रकल्प संचालक रमाकांत जोशी, व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष नितीन होळे, संविधान विचार मंचचे अध्यक्ष अशोक बनसोडे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य, संताजी चालुक्य, जिल्हा सरचिटणीस माधव पवार, तालुकाध्यक्ष कैलास शिंदे, सरचिटणीस सिद्धेश्वर माने, धर्मराज जाधव, रोहित सूर्यवंशी, विष्णू बिराजदार आदी उपस्थित होते.

गरजू कुटुंबांना किराणा वाटप

इंदापूर : वाशी तालुक्यातील इंदापूर येथील कौशल्य फाउंडेशन व स्वयम शिक्षण प्रयोग यांच्या वतीने गरजू कुटुंबांना किराणा साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच गणेश गपाट, सुंदर पारडे, संस्थेच्या सुपरवायझर सीमा सय्यद, स्वाती गपाट, राजश्री कदम, शुभांगी गोरे

आदी उपस्थित होते.

योग दिनानिमित्त ऑनलाइन कार्यक्रम

उस्मानाबाद : आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने श्री माताजी निर्मलादेवी प्रणीत सहजयोग ध्यानकेंद्र प्रतिष्ठान पुणे येथून २० जून रोजी सायंकाळी ५ वाजता ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. माय लाईफ माय मेडिटेशन, मेडिटेशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन, सहजयोग ध्यान याबाबत श्री माताजी निर्मलादेवी योगाचा अर्थ समजावून सांगणार आहेत. डॉ. प्रताप उधवानी आणि डॉ. विश्वजीत चव्हाण हे सहजयोगाचे दैनंदिन जीवनातील फायदे सांगणार आहेत. २१ जून ते १५ ऑगस्ट दरम्यान दररोज संध्याकाळी ५ वाजता मराठी आणि हिंदी भाषेतून सहजयोग ध्यान कार्यशाळा विनामूल्य घेतल्या जाणार असल्याचे महाराष्ट्र राज्य सहजयोग समन्वयक स्वप्निल धायडे व जिल्हा समन्वयक अमर घुटे-पाटील यांनी कळविले आहे.

Web Title: Umakant Mane felicitated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.