वाशी तालुक्यातील सव्वादाेनशे मतदारांना ‘अल्टीमेटम’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:23 IST2021-06-18T04:23:36+5:302021-06-18T04:23:36+5:30
वाशी -मतदार यादीमध्ये फोटो नसलेल्या तालुक्यातील २३५ मतदारांना आपले फोटो २३ जूनपर्यंत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अथवा तहसील कार्यालायातील निवडणूक ...

वाशी तालुक्यातील सव्वादाेनशे मतदारांना ‘अल्टीमेटम’
वाशी -मतदार यादीमध्ये फोटो नसलेल्या तालुक्यातील २३५ मतदारांना आपले फोटो २३ जूनपर्यंत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अथवा तहसील कार्यालायातील निवडणूक विभागाकडे जमा करावे लागणार आहेत, अन्यथा या मतदारांचे नाव मतदार यादीमधून वगळण्यात येणार आहे. या अनुषंगाने तहसीलदार नरसिंग जाधव यांनी बुधवारी पत्रकच काढले आहे.
वाशी तालुका निवडणूक विभागाकडून प्रत्येक गावातील मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना ज्या मतदारांचे फोटो हे कृष्णधवल आहेत वा ज्यांचे फोटो मतदान यादीवर नाहीत अशा मतदारांकडून रंगीत फोटो घेण्याचे काम सोपवण्यात आलेले होते. यामध्ये अनेक मतदारांनी फोटो जमा केलेले आहेत. मात्र, आजही तालुक्यातील २३५ मतदारांनी अद्याप आपले फोटो जमा केलेले नाहीत. संबंधित २३५ मतदारांच्या पत्त्यावर केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या. मात्र, या पत्त्यावर हे मतदार आढळून आलेले नाहीत. त्यामुळे संबंधित ग्रामपंचायत, नगर पंचायत, पंचायत समिती, तसेच तहसील कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर या मतदारांच्या नावाची यादी लावण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार फाेटाे जमा करण्यासाठी २३ जून अंतिम तारीख आहे. त्यामुळे मतदान यादीवर फोटो नसलेल्या मतदारांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अथवा तहसील कार्यालयातील निवडणूक विभागाकडे आपले रंगीत फोटो जमा करावेत. मुदतीत फाेटाे न देणाऱ्या मतदारांचे नाव मतदान यादीतून ‘डिलिट’ केले जाणार आहे.