दोन महिलांचे दुचाकीस्वारांनी मंगळसूत्र हिसकावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:32 IST2021-03-26T04:32:56+5:302021-03-26T04:32:56+5:30

उस्मानाबाद : जिल्ह्यात चोऱ्यांचे सत्र थांबता थांबेना झाले आहे. बुधवारी उस्मानाबाद व उमरगा शहरात पायी चालत जाणाऱ्या दोन महिलांचे ...

Two women were snatched by two-wheelers | दोन महिलांचे दुचाकीस्वारांनी मंगळसूत्र हिसकावले

दोन महिलांचे दुचाकीस्वारांनी मंगळसूत्र हिसकावले

उस्मानाबाद : जिल्ह्यात चोऱ्यांचे सत्र थांबता थांबेना झाले आहे. बुधवारी उस्मानाबाद व उमरगा शहरात पायी चालत जाणाऱ्या दोन महिलांचे गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीस्वारांनी भरदिवसा दिवसा हिसकावून नेल्याच्या घटना घडल्या आहेत.

उमरगा शहरातील रागीणी जगताप या २४ मार्च रोजी शहरातील मुन्शी प्लॉट येथील रस्त्याने घराकडे जात होत्या. यावेळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोन अनोळखी पुरुषांनी जगताप यांच्या गळ्यातील १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. या प्रकरणी रागीणी जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात दोन व्यक्तीिवरुध्द उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. तर दुसऱ्या घटनेत उस्मानाबाद येथील मनिषा वाघमारे या २४ मार्च रोजी संभाजीनगर परिसरातील रस्त्याने पायी जात होत्या. यावेळी पाठीमागून भरधाव वेगाने दुचाकीवरुन आलेल्या दोन व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील १८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पोबारा केला. या प्रकरणी मनिषा वाघमारे यांच्या फिर्यादीवरुन दोन अज्ञात व्यक्तींविरुध्द आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Web Title: Two women were snatched by two-wheelers