अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:33 IST2021-04-07T04:33:33+5:302021-04-07T04:33:33+5:30
उमरगा : शहरातील बाय पास रोडवरील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या एका पेट्रोल पंपासमोर अज्ञात वाहणाच्या ...

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
उमरगा : शहरातील बाय पास रोडवरील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या एका पेट्रोल पंपासमोर अज्ञात वाहणाच्या धडकेत दुचाकीवरील एकजण ठार झाले. तर अन्य दोघे जखमी झाले. ही घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली.
याबाबत पाेलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, शहरातील तरुण नागेश बबन लोखंडे (वय १७, रा. काळे प्लॉट) हा तरुण शेतात ट्रॅक्टरने नांगरणी करीत असलेल्या भावाला डिझेल आणून देण्यासाठी म्हणून गावात आला. त्याचे दोन मित्र अजय संजय साठे (वय २०) व व्यंकटेश ललाप्पा कडगंचे (वय २०) या दोघांना दुचाकीवर (क्र. एमएच. २५-५९०) घेऊन डिझेल आणण्यासाठी पेट्रोल पंपावर जात हाेता. याचवेळी अज्ञात वाहनाने दुचाकीला जाेराची धडक दिली. यात दुचाकीवरील नागेश लोखंडे हा तरूण जागीच ठार झाला. तर अन्य दोघे जखमी झाले आहेत. सदरील घटनेची नाेंद उमरगा पाेलीस ठाण्यात करण्यात आली आहे.