दोन शाळकरी मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू
By Admin | Updated: April 1, 2015 00:56 IST2015-04-01T00:56:06+5:302015-04-01T00:56:06+5:30
येणेगूर / अचलेर : शाळा सुटल्यानंतर शेतात कामाला गेलेल्या आई-वडिलांना भेटण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला.

दोन शाळकरी मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू
तिरोडा: श्रीरामनवमी शोभायात्रा नगर उत्सव समिती तिरोड्याच्या वतीने दुपारी बाईक रॅली व सायंकाळी शोभायात्रा स्थानिक गजानन मंदिराच्या प्रांगणातून काढण्यात आली. बाईक रॅलीला युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तर शोभायात्रेत अनेक संघटना व संस्था तसेच वैयक्तिक चित्ररथ सादर करण्यात आले होते.
चित्ररथांमध्ये प्रजापिता ब्रह्मकुमारीच्या वतीने नवदुर्गा व श्रीरामाची पालखी काढून डी.जे.च्या तालावर तरूणाई थिरकत होती. त्यासाठी विशेष बाहेरून डि.जे. बोलविण्यात आले होते. खियानी परिवारातर्फे विठ्ठल-रूखमाईचे, उत्सव समितीतर्फे ब्राम्हाचे, अजय एस. बचवानी यांनी सुंदर चित्ररथ सादर केले. अनेकता मे एकता भारत महान, पर्यावरण, अदानी फाऊंडेशन तर्फे शारदा, डुप्लीकेट मकरंद अनापुरे व एहसान कुरैशी यांनी प्रेक्षकांना जिंकले. दिलीपकुमार असाटीकडून राधाकृष्णाचे चित्ररथ सादर करण्यात आले. सराफा असोसिएशन तर्फे विठ्ठलाचे चित्ररथ, शंकर, श्रीराम यांचेही रथ समितीतर्फे सादर करण्यात आले.
ही शोभायात्रा स्थानिक गजानन मंदिर, सपना फॅशन, न.प. बगिचा, जुनी वस्ती, मोहनलाल चौक, पोलीस स्थानक चौक व मुख्य मार्गाने पुन्हा गजानन मंदिरात शोभायात्रेचे समारोप करण्यात आले. या वेळी विविध संघटना, वैयक्तिक दानसूर व्यक्तींनी अन्नदान, शरबत, टरबूज, आलुपोहा, पुलावा, पुरीभाजी अशा विविध खाद्य साहित्याचे वितरण केले.
तर जागोजागी श्रीराम भक्तांसाठी पाणी पाऊचची व्यवस्था करण्यात आली होती. त्यात दुर्गा उत्सव समिती आलुपोहा, युवा संग्राम सेवा समिती व किराड समाज तर्फे आलुपोहा, शारदा उत्सव मंडळ सुभाष वार्डतर्फे चना चिवडा, सुनील शेंडे व शालिकराम असाटी तर्फे भेलपुरी, अमित असाटी, बबलू चौरसिया, सतीश बचवानी तर्फे पुरी भाजी व चटणी, बजरंग दल तर्फे मसाला पुलाव व जलेबी, अशोक असाटीतर्फे आलुपोहा तसेच विविध मंडळ, संघटना व वैयक्तिक दानसूर व्यक्तींनी आपापल्या परीने व्यवस्था केलेली होती. तिरोडा गजानन मंदिरापासून काढलेली शोभायात्रा ही तालुक्यातील सर्वात मोठी शोभायात्रा असते.
शोभायात्रेसाठी श्रीराम नवमी शोभायात्रा नगर उत्सव समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)