कर्तव्यात कसूर केल्याने दोन अधिकारी निलंबित
By Admin | Updated: November 5, 2016 17:27 IST2016-11-05T17:27:48+5:302016-11-05T17:27:48+5:30
राज्य निवडणूक आयोग , महाराष्ट्र राज्य यांनी घोषित केल्याप्रमाणे जिल्ह्यातील आठ नगरपरिषदांमध्ये 17 ऑक्टोबर ते 28 नोव्हेंबर 2016 या कालावधीकरिता निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला.

कर्तव्यात कसूर केल्याने दोन अधिकारी निलंबित
>ऑनलाइन लोकमत
उस्मानाबाद, दि. ५ - राज्य निवडणूक आयोग , महाराष्ट्र राज्य यांनी घोषित केल्याप्रमाणे जिल्ह्यातील आठ नगरपरिषदांमध्ये 17 ऑक्टोबर ते 28 नोव्हेंबर 2016 या कालावधीकरिता निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे .
याकरिता जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळीत आहेत.
निवडणुकीच्या कालावधीत निवडणुकीशी संबंधित अधिकारी/ कर्मचारी यांनी कामामध्ये निष्काळजीपणा अथवा कुचराई केली तर त्यांच्याविरुध्द निलंबनासह सर्व प्रकारची कारवाई करण्याचे अधिकार मा. राज्य निवडणूक आयोग , महाराष्ट्र यांनी जिल्हाधिकारी यांना प्रदान केले आहेत. निवडणूक आयोग , महाराष्ट्र व शासन निर्णयान्वये प्रदान केलेल्या अधिकारानुसार जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद येथील नगर विकास शाखेचे जिल्हा प्रशासन अधिकारी दिपक कासार आणि कळंब नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कारभारी शंकर दिवेकर यांना निवडणुकीसारख्या सांविधानिक कामात आपल्या पदाची जबाबदारी टाळून कर्तव्यात कसूर , शासन व वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न केल्याप्रकरणी निलंबनाची कारवाई जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी आज केली . या कारवाईने कामचुकार अधिकारी कर्मचाऱ्यांना दणका बसला आहे.