मराठवाड्यात दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By Admin | Updated: May 7, 2017 03:42 IST2017-05-07T03:42:54+5:302017-05-07T03:42:54+5:30

शेतातील नापिकी, बँकांचे वाढत्या कर्जाच्या चिंतेने मराठवाड्यातील आणखी दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या

Two farmers suicides in Marathwada | मराठवाड्यात दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या

मराठवाड्यात दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या

लोकमत न्यूज नेटवर्क
नळदुर्ग / नायगाव बाजार : शेतातील नापिकी, बँकांचे वाढत्या कर्जाच्या चिंतेने मराठवाड्यातील आणखी दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. उस्मानाबाद आणि नांदेड जिल्ह्यांत या घटना घडल्या.
उस्मानाबाद जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यातील होर्टी येथे महेश व्यंकट राजमाने (३२) यांच्यावर विविध कार्यकारी सोसायटी व दोन बँकांचे मोठे कर्ज आहे. महेश यांच्या पश्चात आई-वडील, मनोरुग्ण भाऊ, पत्नी व दोन लहान मुले असा परिवार आहे.
अन्य घटनेत नांदेड जिल्ह्यातील नायगाव बाजार येथे शिवाजी नागोराव चव्हाण (५५) या शेतकऱ्याने विषप्राशन करून आत्महत्या केली़

Web Title: Two farmers suicides in Marathwada