अडीच कोटींची कामे स्थगित

By Admin | Updated: February 4, 2015 00:40 IST2015-02-04T00:36:33+5:302015-02-04T00:40:20+5:30

उस्मानाबाद : दलित वस्त्यांतील विकास कामांसोबतच गावांतर्गत रस्त्याच्या तब्बल ३९ कामांना शासनाने थगिती आदेश दिला आहे. या कामांसाठी सुमारे २ कोटी ५८ लाख रूपये एवढा निधी मंजूर झाला आहे

Two-and-a-half million jobs are postponed | अडीच कोटींची कामे स्थगित

अडीच कोटींची कामे स्थगित


उस्मानाबाद : दलित वस्त्यांतील विकास कामांसोबतच गावांतर्गत रस्त्याच्या तब्बल ३९ कामांना शासनाने थगिती आदेश दिला आहे. या कामांसाठी सुमारे २ कोटी ५८ लाख रूपये एवढा निधी मंजूर झाला आहे. पुढील आदेश येईपर्यंत ही कामे सुरू करण्यास मनाई केली आहे.
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या माध्यमातून दलित वस्त्यांमध्ये विविध विकासाची कामे राबविण्यात येतात. तसेच गावांतर्गत रस्तेही याव विभागाकडून केले केले जातात. त्यानुसार २०१३-१४ ते २०१४-१५ या दोन वर्षांमध्ये विविध विकास कामे राबविण्यात आली. तसेच उर्वरित ३९ कामांना मंजुरीही देण्यात आली होती. यासाठी तब्बल २ कोटी ५८ लाख रूपयांची तरतूद करण्यात आली होती. परंतु, भाजपा सरकार सत्तेत आल्यानंतर संबंधित कामांना स्थगिती आदेश देण्यात आला आहे. विशेष म्हणजे पुढील आदेश येईपर्यंत संबंधित कामे सुरू करू नयेत, असे आदेशामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आता संबंधित गावांमध्ये कामे राबविण्यासाठी शासनाच्या पुढील आदेशाची वाट बघावी लागणार आहे.
विविध स्वरूपाच्या ३९ कामांसाठी सुमारे अडीच कोटींचा निधी मंजूर होता. परंतु, शासनाने नवीन आदेश येईपर्यंत ही कामे स्थगित ठेवण्याबाबत आदेशित केले आहे. त्यामुळे शासनाचा नवीन आदेश येईपर्यंत सदरील कामे सुरू करता येणार नाहीत, असे बांधकाम विभागाचे अभियंता ओ. के. सय्यद यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

Web Title: Two-and-a-half million jobs are postponed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.