वादळी पावसामुळे वीस गावे अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:30 IST2021-05-17T04:30:51+5:302021-05-17T04:30:51+5:30

शहर व परिसरातील केसरजवळगा, आलूर, बेळंब, मुरुम, भुसणी, कोथळी या गावात शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला ...

Twenty villages in darkness due to torrential rains | वादळी पावसामुळे वीस गावे अंधारात

वादळी पावसामुळे वीस गावे अंधारात

शहर व परिसरातील केसरजवळगा, आलूर, बेळंब, मुरुम, भुसणी, कोथळी या गावात शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. साडेसहा वाजेपर्यंत हा पाऊस सुरू होता. मुरुम व आलूर या दोन्ही उपकेंद्रांना उमरगा येथील १३२ केव्ही वीज उपकेंद्रातून वीजपुरवठा केला जातो. पावसामुळे या मुख्य वाहिनीत भुसणी गावाजवळ वीज तारा तुटून वीजपुरवठा खंडित झाल्याने या दोन्हीही उपकेंद्राअंतर्गत येणारी गावे रात्री ९ वाजेपर्यंत अंधारात बुडाली होती. यानंतरही वादळी वारे आणि पाऊस सुरूच होता. यासंदर्भात मुरुम येथील महावितरण ग्रामीण कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता सागर सायगावकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, उमरगा येथून मुरुम व आलूर वीज उपकेंद्राला वीजपुरवठा केला जातो. वीजपुरवठा करणाऱ्या मुख्य वाहिनीत भुसणी गावाजवळ वादळी पावसाने तांत्रिक बिघाड होऊन मोठा जाळ झाल्याने वीजपुरवठा खंडित झाल्याचे ते म्हणाले.

Web Title: Twenty villages in darkness due to torrential rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.