प्रदेशाध्यक्षपदी तुषार वाघमारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:36 IST2021-03-01T04:36:50+5:302021-03-01T04:36:50+5:30
कळंब : देशभरातील फार्मासिस्टचे संघटन असलेल्या इंडियन फार्मासिस्ट असोसिएशनच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी तालुक्यातील बाभळगाव येथील रहिवासी असलेले प्रा. तुषार वाघमारे ...

प्रदेशाध्यक्षपदी तुषार वाघमारे
कळंब : देशभरातील फार्मासिस्टचे संघटन असलेल्या इंडियन फार्मासिस्ट असोसिएशनच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी तालुक्यातील बाभळगाव येथील रहिवासी असलेले प्रा. तुषार वाघमारे यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अभयकुमार, सरचिटणीस भुपेंद्र कुमार यांनी ही निवड केली आहे.
फार्मासिस्ट बांधवांचे संघटन करून राष्ट्रव्यापी चळवळ उभी करण्यासाठी इंडियन फार्मासिस्ट असोसिएशनची स्थापना करण्यात आली आहे. याच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी प्रा. तुषार बिभीषण वाघमारे यांची निवड करण्यात आली आहे. याशिवाय उपाध्यक्षपदी बालाजी पानझडे, कोषाध्यक्ष नितीन उगले यांची, तर राज्य कार्यकारिणी सदस्य म्हणून रामेश्वर मुंडे, भारती मोहोकर, विवेक सरवदे, विनोद तरडे, कीर्ती मठपती, सोहनकुमार देसरडा, संतोष सिंग, अर्षद शेख, डॉ. उस्मान यांची निवड करण्यात आली आहे.
प्रदेशाध्यक्षपदी निवड झालेले प्रा. तुषार वाघमारे हे महाराष्ट्रातील एक अभ्यासू युवक, वक्ता, प्रगतिशील शेतकरी, यशस्वी व्यावसायिक म्हणून परिचित आहेत. राष्ट्रवादी वक्ता प्रशिक्षण विभागातही त्यांचे राज्यस्तरावर दखलपात्र असे काम आहे. विविध सामाजिक उपक्रमात त्यांचा सहभाग असतो. त्यांच्या या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे.