तुळजापूर एस. टी. कामगार सेनेची कार्यकारिणी जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:43 IST2021-02-27T04:43:32+5:302021-02-27T04:43:32+5:30
तुळजापूर : तुळजापूर आगाराच्या एस. टी. कामगार सेनेची कार्यकारिणी गुरुवारी जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदी बालाजी पवार, तर सचिवपदी बालाजी ...

तुळजापूर एस. टी. कामगार सेनेची कार्यकारिणी जाहीर
तुळजापूर : तुळजापूर आगाराच्या एस. टी. कामगार सेनेची कार्यकारिणी गुरुवारी जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदी बालाजी पवार, तर सचिवपदी बालाजी शिंदे यांची वर्णी लागली. उर्वरित कार्यकारिणीत कार्याध्यक्ष म्हणून अजय गावडे, उपाध्यक्ष अमोल सरडे व सुरेश जन्मले, सहसचिव समाधान शिंदे व सोमणाथ जाधव, संघटक सचिव रमेश राठोड, सहकार्याध्यक्ष चंद्रकांत बुट्टे, प्रसिध्दी प्रमुख धोंडीराम ढगे, कोषाध्यक्ष संतोष मंजुळकर, सहकोषाध्यक्ष सोपान डोळस, ता. सल्लागारपदी पोपट भोसले, उत्तम साठे, भैरू कुंभार, देवानंद ढगे, मंजुर तांबोळी यांची वर्णी लागली. महिला प्रतिनिधी म्हणून छाया इंगळे, पुजा गायकवाड यांना संधी मिळाली. शिवसेना उपजिल्हाप्रमुख शाम पवार व शिवसेना शहरप्रमुख सुधीर कदम यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.