आदिवासी समाजाला मिळाली सभापतिपदाची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:18 IST2021-02-05T08:18:13+5:302021-02-05T08:18:13+5:30
कळंब : नगर परिषदेतील सत्ताधाऱ्यांकडून ‘सबका साथ’चा स्तुत्य निर्णय कळंब : येथील नगर परिषद सभागृहात पार पडलेल्या नगरपरिषद ...

आदिवासी समाजाला मिळाली सभापतिपदाची संधी
कळंब : नगर परिषदेतील सत्ताधाऱ्यांकडून ‘सबका साथ’चा स्तुत्य निर्णय
कळंब : येथील नगर परिषद सभागृहात पार पडलेल्या नगरपरिषद विषय समितीच्या निवडीत विरोधीपक्ष शिवसेनेच्या पारड्यात महिला व बालकल्याण समिती तर शिक्षण, विद्युत, रहदारी नियमन समितीचे सभापतीपद आदिवासी समाजातील राष्ट्रवादीच्या नगरसेवकाकडे देऊन सत्ताधारी मंडळींनी ‘सबका साथ’ चा स्तुत्य निर्णय घेतला. विषय समितीच्या निवडी अशा : पाणीपुरवठा, आरोग्य व स्वच्छता समिती - पदसिध्द सभापती उपनगराध्यक्ष संजय मुंदडा, सदस्य : गीता पुरी, साधना बागरेचा, मुश्ताक कुरेशी, अनंत वाघमारे. बांधकाम व पुरवठा समिती सभापती इंदुमती हौसलमल, सदस्य - अमर गायकवाड, सफुरा काझी, मीरा चोंदे, सतीष टोणगे. शिक्षण, विद्युत व रहदारी नियमन समिती सभापती - सुभाष पवार, सदस्य - गीता पुरी, साधना बागरेचा, अश्विनी शिंदे, अनंत वाघमारे, महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी सुरेखा पारख, उपसभापतीपदी अश्विनी शिंदे, सदस्य - मीरा चोंदे, सतीश टोणगे, गीता पुरी. स्थायी समिती थेट सदस्यपदी राष्ट्रवादीचे गटनेते लक्ष्मण मनोहर कापसे यांची निवड करण्यात आली असून, समितीच्या पदसिद्ध सभापती म्हणून नगराध्यक्षा सुवर्णा सागर मुंडे या राहतील.
यावेळी स्थायी समिती सदस्यपदी संजय मुंदडा, इंदुमती हौसलमल, सुरेखा पारख, सुभाष पवार यांची निवड करण्यात आली. पीठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार मंजुषा लटपटे तर सहाय्यक अधिकारी म्हणून मुख्याधिकारी देविदास जाधव यांनी काम पाहिले. त्यांना कार्यालयीन अधीक्षक दीपक हारकर, विभाग प्रमुख सुधीर चोंदे यांनी सहकार्य केले. बैठकीला नगराध्यक्षा सुवर्णा मुंडे, उपनगराध्यक्ष संजय मुंदडा यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते.
तुळजापुरात आनंदोत्सव
तुळजापूर : येथील नगरपरिषदेची विशेष सर्वसाधारण सभा पीठासीन अधिकारी तहसीलदार सौदागर तांदळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी विषय समितीच्या व सभापतींच्या निवडी करण्यात आल्या. यात आरोग्य व स्वच्छता समिती सभापती सचिन रोचकरी, बांधकाम समिती सभापती विजयकुमार कंदले, शिक्षण विभाग सभापती किशोर साठे, पाणीपुरवठा समिती सभापती सुनील रोचकरी, महिला व बालकल्याण समिती सभापती हेमा कदम, स्थायी समिती सभापती सचिन रोचकरी यांच्या निवडी झाल्या. यावेळी मुख्याधिकारी आशिष लोकरे, सभा लिपिक अंधारे, सर्व नगरसेवक व कर्मचारी उपस्थित होते. या निवडीनंतर नूतन विषय समिती सभापतींचा उपस्थितांनी सत्कार करून त्यांचे स्वागत केले. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून आपला आनंद साजरा केला
बांधकाम समितीवर गाढवे बिनविरोध
भूम : येथील नगर परिषदेत नियोजन, बांधकाम व विकास समितीच्या सभापतिपदी उपनगराअध्यक्षा संयोगीता गाढवे यांची बिनविरोध निवड तर आरोग्य पाणी पुरवठा विभाग सभापतीपदी नगरसेविका सय्यद मेहेराजबेग शब्बीर यांची निवड झाली. नगरपरिषद सभागृहात विषय समिती निवडीबाबत पीठासीन अधिकारी तथा तहसील उषाकिरण श्रृंगारे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेण्यात आली. यावेळी स्थायी समिती सभापतीपदी नगराअध्यक्षा सुप्रिया वारे, महिला व बाल विकास सभापतीपदी नगरसेविका सारिका सुनिला थोरात, शिक्षण ग्रंथालय सभापतीपदी नगरसेविका अनिता राम वारे यांची निवड करण्यात आली आहे.
यावेळी गट नेते संजय गाढवे, नगराध्यक्षा सुप्रिया वारे, उपनगराअध्यक्षा संयोगिता गाढवे, नगरसेविका सारिका थोरात, सुमन मांजरे, शिवशाला शेंडगे, भागुबाई माळी, सविता लोंढे, मेहेराजबेग सय्यद, नगरसेवक संजय पवार, सागर टकले, सुमित तेलंग, आश्रुबा नाईकवाडी, स्वीकृत सदस्य संदीप मोटे, किरण जाधव व काॅंग्रेसचे नगरसेवक रोहन जाधव आदी उपस्थित होते. यावेळी निवड झालेल्या सदस्याचा सत्कार करण्यात आला.
कॅप्शन -
भूम नगरपरिषदेच्या शिक्षण ग्रंथालय सभापतीपदी नगरसेविका अनिता वारे यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करताना उपनगराअध्यक्षा संयोगिता गाढवे. समवेत नगरसेविका भागुबाई माळी ( छाया देविदास माळी भूम)
कॅप्शन - कळंब नगरपरिषदेतील विविध विषय समित्यांच्या निवडी पार पडल्या. त्या समितीवरील सभापतींचा सत्कार नगराध्यक्षा सुवर्णा मुंडे यांनी केला. यावेळी उपनगराध्यक्ष संजय मुंदडा, मुख्याधिकारी देविदास जाधव, गटनेते लक्ष्मण कापसे, नूतन सभापती इंदुमती हौसलमल, अश्विनी शिंदे, सुभाष पवार,सुरेखा पारख यांची उपस्थिती होती.