वृक्षाराेपणाने नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:22 IST2021-06-17T04:22:40+5:302021-06-17T04:22:40+5:30
भूम - सध्या काेराेनाचे संकट आहे. त्यामुळे शाळा बंद आहेत. काेराेनाच्या काळात निर्माण झालेला ऑक्सिजन तुटवडा लक्षात घेऊन येथील ...

वृक्षाराेपणाने नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात
भूम - सध्या काेराेनाचे संकट आहे. त्यामुळे शाळा बंद आहेत. काेराेनाच्या काळात निर्माण झालेला ऑक्सिजन तुटवडा लक्षात घेऊन येथील गटशिक्षण अधिकारी कार्यालयाने नावीन्यपूर्ण उपक्रम राबविला आहे. वृक्षाराेपणाने नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात केली. या उपक्रमाचे सर्वत्र काैतुक हाेत आहे.
काेराेनाच्या संकटामुळे मागील दीड वर्षांपासून शाळा भरल्या नाहीत. सध्या काेराेना विषाणूचा संसर्ग ओसरला असला तरी धाेका टळलेला नाही. त्यामुळे नवीन शैक्षणिक वर्षातही शाळा ‘लाॅक’च राहणार आहेत. परंतु, या काळात विद्यार्थ्यांचे नुकसान हाेऊ नये, यासाठी शासनाने ऑनलाइन शिक्षण देण्याचे फर्मान काढले आहे. त्यानुसार १५ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली. दरवर्षाप्रमाणे प्रवेशाेत्सव शाळा-शाळांत साजरा करता आला नाही. त्यामुळे गटशिक्षणाधिकारी सुनील गायकवाड यांनी पुढाकार घेत आगळावेगळा उपक्रम राबविला. ऑनलाइन शिक्षणाची सुरुवात व वृक्षाराेपणाने नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात करण्यात आली. अनेक शाळा क्वारंटाईनसाठी ताब्यात घेण्यात आल्या हाेत्या. अशा शाळा १५ जूनपूर्वीच सॅनिटाईझ करून घेण्यात आल्या. एवढेच नाही तर ऑनलाइन अध्यापनाचे नियाेजन करून त्यास सुरुवातही केली आहे. गटशिक्षणाधिकारी गायकवाड यांनी राबविलेल्या उपक्रमाचे सर्वत्र काैतुक हाेत आहे.
फाेटाे ओळी...
भूम तालुक्यातील हाडाेंगी येथील भगवंत विद्यालयाच्या परिसरात शाळेच्या पहिल्या दिवशी वृक्षाराेपण करण्यात आले. याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी सुनील गायकवाड यांच्यासह मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित हाेते.