बाळेश्वर विद्यालय परिसरात वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:40 IST2021-07-07T04:40:24+5:302021-07-07T04:40:24+5:30
अणदूर : येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बारूळ येथील श्री. बाळेश्वर विद्यालय परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण तसेच नवीन इमारत ...

बाळेश्वर विद्यालय परिसरात वृक्षारोपण
अणदूर : येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बारूळ येथील श्री. बाळेश्वर विद्यालय परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण तसेच नवीन इमारत बांधकामाचा पायाभरणी समारंभ पार पडला. अध्यक्षस्थानी औरंगाबाद खंडपीठाचे लक्ष्मीकांत पाटील, तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच रामचंद्र आलुरे, नागनाथराव कानडे, बाबूराव यावलकर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक कैलास गवळी, सेवानिवृत्त मुख्याध्यापिका म्हाळसाताई कदम, जवाहर विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेश ठोंबरे, हंगरगा येथील राजीव गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक राजकुमार ठोंबरे, बाळेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक मंगेश अणदूरकर, सरपंच, उपसरपंच, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, ग्रामस्थ व माजी विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी बाबूराव यावलकर यांनी १ लाख ११ हजार, कदम यांनी ५० हजार, तर सरपंच, उपसरपंच यांनी प्रत्येकी २१ हजार रुपये शाळेच्या इमारतीसाठी देणगीस्वरूपात दिले. प्रास्ताविक प्रदीप कदम, सूत्रसंचालन हजारे यांनी केले. उपसरपंच नबीलाल शेख यांनी आभार मानले.