कोरोना काळात ५७ बाधित गर्भवती महिलांवर उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:22 IST2021-06-20T04:22:34+5:302021-06-20T04:22:34+5:30

उस्मानाबाद : कोरोना काळात ५७ कोरोनाबांधित गर्भवती महिलांपैकी काही महिलांची प्रसूती आणि उर्वरित महिलांना योग्य स्वरूपात वैद्यकीय ...

Treatment of 57 infected pregnant women during Corona period | कोरोना काळात ५७ बाधित गर्भवती महिलांवर उपचार

कोरोना काळात ५७ बाधित गर्भवती महिलांवर उपचार

उस्मानाबाद : कोरोना काळात ५७ कोरोनाबांधित गर्भवती महिलांपैकी काही महिलांची प्रसूती आणि उर्वरित महिलांना योग्य स्वरूपात वैद्यकीय सुविधा देण्याचे काम येथील स्त्री रुग्णालयातील डॉक्टरांनी पार पाडले आहे. शिवाय, आयुर्वेदिक महाविद्यालयातील विलगीकरण केंद्रात शुक्रवारी जिल्हा स्त्री रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. स्मिता सरोदे-गवळी यांच्या नेतृत्वाखाली कोरोना पॉझिटिव्ह महिलेवर यशस्वीपणे सिझरदेखील करण्यात आले.

जिल्हयातील कोरोनाबाधित गर्भवती महिलांची विलगीकरणांची व्यवस्था शहरातील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात करण्यात आली आहे. येथेच अशा महिलांच्या प्रसूतीदेखील केल्या जात आहेत. येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात शुक्रवारी एक गर्भवती महिला प्रसूतीसाठी दाखल झाली होती. या महिलेची रॅपिड अँटिजेन चाचणी केली असता ती कोरोना पॉझिटिव्ह आली. त्यामुळे या महिलेस शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या कोरोना विलगीकरण केंद्रात दाखल करण्यात आले. या महिलेच्या सर्व तपासण्या केल्या असता तिची नैसर्गिक प्रसूती करणे शक्य नसल्याचे निर्देशनास आले. त्यामुळे डॉक्टरांनी या महिलेची सिझर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. डॉ.सरोदे –गवळी यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांच्या पथकाने अतिशय जोखमीची ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली. या कोरोनाबाधित महिलेने तीन किलो वजन असलेल्या गोंडस मुलास जन्म दिला आहे. या बाळाची आरटीपीसीआर ही कोरोना चाचणी करण्यात आली असून, अहवाल प्रलंबित आहे. सध्या या महिलेची व बाळाची प्रकृती चांगली आहे. या महिलेची यापूर्वी दोनवेळा प्रसूतीसाठी सिझर शस्त्रक्रिया करून झाल्या होत्या. त्यामुळे यावेळची सिझर शस्त्रक्रिया अतिशय जोखमीची होती, अशी माहिती डॉ.सरोदे-गवळी यांनी दिली.

या महिलेची सिझर शस्त्रक्रिया करताना कोरोनासंबंधी नियमांचे पूर्ण पालन करण्यात आहे.

ही सिझर शस्त्रक्रिया डॉ. स्मिता सरोदे-गवळी, डॉ. सुधीर सोनटक्के, डॉ. रेखा टिके, डॉ. मुकुंद माने, डॉ. मुकेश, डॉ. आगवणे,डॉ. दिशा केसूर, डॉ. अश्विनी पाटील, डॉ. श्रध्दा तथा परिचारिका दाणे आदींनी यशस्वी केली.

१६ महिलांच्या नैसर्गिक प्रसूती

कोरोना महामारीच्या काळातही येथील जिल्हा स्त्री रुग्णालयातील डॉक्टरांनी कोरोना बांधित ५७ गर्भवती महिलांवर यशस्वीपणे उपचार करण्याचे काम केले आहे. तसेच या काळात जिल्हा स्त्री रुग्णालयातील डॉक्टरांनी १६ गर्भवती कोरोनाबाधित महिलांच्या नैसर्गिक स्वरूपात प्रसूतीही केल्या आहेत. उर्वरित प्रसूतीस पात्र नसलेल्या पण गर्भवती कोरोना पॉझिटिव्ह महिलावर योग्यप्रकारे उपचार करून त्यांची आणि त्यांच्या बाळांची योग्य योग्यप्रकारे काळजी घेत उपचारही करण्यात आले.

Web Title: Treatment of 57 infected pregnant women during Corona period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.