कळंबचे गटविकास अधिकारी राजगुरू यांची बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:34 IST2021-09-03T04:34:42+5:302021-09-03T04:34:42+5:30

कळंब पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदाची धुरा मागच्या तीन वर्षांपासून नामदेव पांडुरंग राजगुरू हे सांभाळत होते. कोरोनाकाळात त्यांनी अतिशय ...

Transfer of Rajguru, Group Development Officer, Kalamb | कळंबचे गटविकास अधिकारी राजगुरू यांची बदली

कळंबचे गटविकास अधिकारी राजगुरू यांची बदली

कळंब पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदाची धुरा मागच्या तीन वर्षांपासून नामदेव पांडुरंग राजगुरू हे सांभाळत होते. कोरोनाकाळात त्यांनी अतिशय चोखपणे कामगिरी बजावली होती. शिवाय कर्मचारी, पदाधिकारी यांना विश्वासात घेत कामाचा निपटारा करण्यावर भर दिला होता. मात्र, बदलीपात्र असल्याने त्यांची बदली होण्याची शक्यता वर्तवली जात होती. यातच काही सत्ताधाऱ्यांना आपल्याशी सूर जुळवणारा अधिकारी हवा होता. यामुळे बदलीच्या चर्चेने वेग घेतला होता. यातच त्यांच्या बदलीचे गुरुवारी आदेश प्राप्त झाले आहेत.

चौकट...

चकोर यांची नियुक्ती....

कळंब पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एन. पी. राजगुरू यांची लगतच्या वाशी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारीपदी वर्णी लागली असून त्यांच्या जागेवर पालम जिल्हा परभणी येथे कार्यरत असलेल्या आर. व्ही. चकोर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चकोर यांनी यापूर्वी कळंब येथे प्रभारी, तर उस्मानाबाद येथे नियमित गटविकास अधिकारी म्हणून कामकाज पाहिले आहे.

Web Title: Transfer of Rajguru, Group Development Officer, Kalamb