शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
2
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
3
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
4
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
5
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
6
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार
7
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
8
७ महिन्यातील सर्वात मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे ६.६५ लाख कोटी पाण्यात, तब्बल १५४ शेअर्स नीचांकीवर
9
Latur: 'मला वाचवा', आयुष्य संपवायचं म्हणून तरुणीने पाण्यात उडी मारली अन् पुन्हा जगण्याची इच्छा झाली
10
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
11
मुंबईत बेकायदेशीर भाडे आकारणाऱ्या अ‍ॅप-आधारित टॅक्सी, रिक्षा आणि वाहनांवर कारवाईचा बडगा
12
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
13
सिमेंटची गोणी ४२५ वरून ३७५ रुपयांवर! पण, कंपन्या करू शकतात चलाखी? ग्राहकांना लाभ मिळणार का?
14
"तो काय बोलतो तुम्हाला तरी कळतं का?", भार्गवला हिणावणाऱ्यांना भावाचं सणसणीत उत्तर, म्हणाला...
15
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
16
कार, आयफोन आणि विदेशवारीचे आमिष देऊन करत होता विद्यार्थिनींची निवड! चैतन्यानंदवर आणखी गंभीर आरोप
17
"दुर्गा मातेला प्रार्थना करतो की, निवडणुकीनंतर असे सरकार बनावे जे..."; बंगालमध्ये नेमकं काय म्हणले अमित शाह?
18
Amazon.in च्या 'ग्रेट सेव्हिंग्ज सेलिब्रेशन' स्टोअरफ्रंटसह GST बचतीचा धमाका
19
तू परत आलास..?? IND vs PAK Final वरून पाकिस्तानची खिल्ली उडवणाऱ्या भन्नाट मीम्सचा पाऊस
20
Vodafone-Idea च्या शेअरमध्ये मोठी घसरण, AGR प्रकरणाची पुढील सुनावणी ६ ऑक्टोबरला

आज तुळजाभवानीची 'रथ अलंकार महापूजा'; सूर्य नारायणाचा रथ घेऊन देवी पाहते भक्तांच्या व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 13:54 IST

ललिता पंचमीच्या निमित्ताने रथ अलंकार महापूजेला आहे विशेष महत्व; भर पावसातही हजारो भाविकांची उपस्थिती

- गोविंद खुरूदतुळजापूर (धाराशिव): शारदीय नवरात्र उत्सवातील अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ललिता पंचमीच्या (पाचव्या माळेच्या) निमित्ताने आज तुळजाभवानी मातेची विशेष 'रथ अलंकार महापूजा' मांडण्यात आली. भर पावसातही तुळजापुरात हजारो भाविकांनी हजेरी लावून देवीच्या या विहंगम रूपाचे दर्शन घेतले.

शुक्रवारी पहाटे ६ वाजता अभिषेक घाट आणि पंचामृत अभिषेकास प्रारंभ झाला. दैनंदिन विधी पार पडल्यानंतर भोपे पुजारी बांधवांनी ललिता पंचमीनिमित्त देवीची विशेष रथ अलंकार महापूजा मांडली. या पूजेत सिंहासनाला चांदीचा रथ बनवण्यात आला होता. या रथासमोर सात अश्व (घोडे) बांधलेले असून, आई तुळजाभवानी हातात चाबुक घेऊन या रथात आरूढ झालेली दिसत होती. तुळजाभवानी या रथात बसून पृथ्वी भ्रमणाला निघाली आहे, अशा पद्धतीने ही आकर्षक पूजा साकारण्यात आली होती.

रथ अलंकार महापूजेचे खास महत्त्वधार्मिक आख्यायिकेनुसार, भगवान सूर्यनारायण यांनी त्रिलोक भ्रमणासाठी आपला रथ तुळजाभवानी मातेस दिला होता. याच रथात बसून माता तुळजाभवानी पृथ्वीवरच्या आपल्या भक्तांच्या सुख-दुःखांच्या व्यथा जाणून घेते, अशी श्रद्धा आहे. याच परंपरेतून या रथ अलंकार अवतार पूजेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. भर पावसातही आई तुळजाभवानीचे हे अद्भुत रूप पाहण्यासाठी हजारो भाविकांनी तुळजापुरात गर्दी केली होती.

विशेष छबीना मोर दर्शनास गर्दीदरम्यान,गुरुवारी सायंकाळची अभिषेक पूजेनंतर तुळजाभवानीचा शारदीय नवरात्रातील विशेष छबीना मोर या वाहनावर काढण्यात आला होता. हा छबीना पाहण्यासाठी व दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. यावेळी मंदिर अधिकारी, पुजारी, गोंधळी, आराधी सेवेकरी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी संपूर्ण मंदिर भक्तिमय वातावरणाने न्हाऊन गेले होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Tuljabhavani's 'Chariot Decoration Mahapooja'; Goddess Observes Devotees' Plight on Sun's Chariot

Web Summary : Tuljabhavani's special 'Chariot Decoration Mahapooja' was held on Lalita Panchami. Thousands of devotees thronged Tuljapur despite heavy rain to witness the unique spectacle. The goddess, seated on a silver chariot with seven horses, observes devotees' joys and sorrows, continuing a tradition rooted in mythology.
टॅग्स :dharashivधाराशिवspiritualअध्यात्मिक