शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

सरकारची तुटपुंजी मदत घेण्यापेक्षा मंत्र्यांना झोडपून काढा, राजू शेट्टींचा गारपिटग्रस्त शेतकऱ्यांना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2018 20:23 IST

गारपीट नुकसानग्रस्तांनी सरकारची तूटपूंजी मदत घेण्यापेक्षा मंत्र्यांना झोडपून काढा, त्याशिवाय हे सरकार वठणीवर येणार नाही. मंत्र्यांना झोडण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना पुढाकार घेईल...

उस्मानाबाद – गारपीट नुकसानग्रस्तांनी सरकारची तूटपूंजी मदत घेण्यापेक्षा मंत्र्यांना झोडपून काढा, त्याशिवाय हे सरकार वठणीवर येणार नाही. मंत्र्यांना झोडण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना पुढाकार घेईल,  शेतकऱ्यांनीही सोबत यावे, असं आवाहन खासदार राजू शेट्टी यांनी शेतक-यांना केलं आहे.

 सहकारमंत्री देशमुख म्हणतायत. भाजप सरकारनं २३ हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले आहेत. मात्र प्रत्यक्षात अनेकांना दमडीही मिळालेली नाही, मात्र सरकार सातत्यानं फसव्या घोषणा करत आहे. आता गावागावातील बँका कर्जमाफी घोषणेनंतरच्या सहा महिन्यांचे व्याज आकारणीसाठी शेतकऱ्यांना वेठीस धरत असल्याचा आरोपही त्यावेखी खासदार शेट्टी यांनी केला आहे.

दरम्यान शेतकऱ्यांनी संघटीत शक्तीच्या बळावर समस्यांसाठी लढले पाहिजे. आम्ही लढतोय म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा धसका सरकारनं घेतला आहे. त्यामुळेचं मंत्री दौऱ्यावर आल्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची धरपकड होत आहे. तसेच मंत्रालयाला जाळी लावल्यावर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील हा जावईशोध कुठल्या मुर्ख मंत्र्यांने लावलाय हे कळेना अशी टीका खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.

तसेच पामतेल आयात केल्यामुळे सोयाबीनचे दर पडले, मोठ्या प्रमाणात डाळी आयात केल्या, त्यामुळे तुरीचे दर पडले, हा सरकारच्या चुकीच्या आयात धोरणाचा परिणाम आहे, त्यामुळे शेतकरी कर्जात बूडतोय, यामागे शेतकऱ्यांचा दोष नाही,त्यामुळे आम्ही कर्जमाफी नाही तर कर्जमुक्ती करण्यासाठी सातबारा करण्याची मागणी करत असल्याचंही ते म्हणला आहेत.तसेच पाकिस्तानमधून चोरट्या मार्गाने साखर आयात केल्यानं भारतातल्या साखरेचे दर पाडले, त्यामुळे साखार कारखाने ऊस उत्पादकांना एफआरपी देऊ शकत नसल्याची ओरड करतायत, मात्र आम्ही त्याविरोधातही लढा देणार असल्याची घोषणाही त्यावेळी शेट्टी यांनी केली आहे.तसेच उस्मानाबादमधील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आर्यन शुगर साखर कारखाना आणि जयलक्ष्मी कारखान्यांनी पैसे बूडवलेले आहेत. दोन वर्षे थांबूनही पैसे मिळत नाहीत. आता त्याविरोधात लढा उभारण्याची गरज असल्याचंही राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीFarmerशेतकरीagricultureशेती