तीन वाहन चोरटे जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:33 IST2021-05-10T04:33:19+5:302021-05-10T04:33:19+5:30

उस्मानाबाद : दोन दुचाकी व ट्रॅक्टर चोरणाऱ्या ३ आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ८ मे रोजी तुळजापूर व लोहारा ...

Three vehicle thieves arrested | तीन वाहन चोरटे जेरबंद

तीन वाहन चोरटे जेरबंद

उस्मानाबाद : दोन दुचाकी व ट्रॅक्टर चोरणाऱ्या ३ आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ८ मे रोजी तुळजापूर व लोहारा येथून ताब्यात घेतले.

तुळजापूर ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा नोंद होता. हा आरोपी पोलिसांस पाहिजे होता. मात्र, तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. ८ मे रोजी तुळजापूर शहरातील अभिजित शिंदे याच्याकडे चोरी गेलेली दुचाकी असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास माहिती प्राप्त झाली. या माहितीच्या आधारे पथकाने त्यास दुचाकीसह ताब्यात घेऊन पुढील तपासास तुळजापूर पोलिसांच्या स्वाधीन केले.

तर दुसऱ्या घटनेत लोहारा ठाण्यात ट्रॅक्टर चोरीचा गुन्हा नोंद होता. या चोरीतील आरोपी पोलिसांच्या हाती लागत नव्हता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास तपासादरम्यान लोहारा (खु.) येथील रहिवासी हनुमंत रसाळ, आकाश कांबळे या दोघांना नमूद चोरीचा ट्रॅक्टर व चोरी करण्यासाठी वापरलेली दुचाकीसह लोहारा येथून ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्या ताब्यात असलेल्या अन्य एका दुचाकीचा ताबा-मालकीविषयी त्यांना विचारणा केली. मात्र, त्यांनी समाधानकार माहिती दिली नाही. यावर पथकाने दुचाकीचा सांगाडा व इंजिन क्रमांच्या साहाय्याने तांत्रिक तपास केला. यावरून दुचाकी अहमदनगर जिल्ह्यातील असल्याचे उघड झाले. दुचाकी चोरीचा गुन्हा संगमनेर ठाण्यात नोंद होता. पथकाने त्या दोघांना दोन्ही चोरीतील ट्रॅक्टर, दुचाकीसह लोहारा पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले. तसेच अहमदनगर पोलिसांस संबंधित दुचाकी चाेरीच्या जप्तीबाबत कळविण्यात आले.

Web Title: Three vehicle thieves arrested