शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

गूढ आवाजाने पंधरा दिवसातून तिसऱ्यांदा उस्मानाबाद जिल्हा हादरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 14:14 IST

उस्मानाबाद जिल्ह्यात गूढ आवाजाचा पुन्हा हादरा 

ठळक मुद्देपंधरा दिवसांतील तिसरी घटना  आवाजाने नागरिकांमध्ये भीती

उस्मानाबाद : जिल्ह्याच्या काही भागात सातत्याने जोरदार आवाज होऊन त्याचा जबर हादरा बसत आहे़ या आवाजाचे गूढ उकलण्यात अजूनही प्रशासनाला यश आले नाही़ मंगळवारी दुपारी जिल्ह्यातील भूम, परंडा, कळंब तालुका परिसर या आवाजाने पुन्हा हादरला़

उस्मानाबाद जिल्ह्यात मागील पंधरा दिवसांमध्ये तीनवेळा जोरदार आवाजाचा हादरा नागरिकांना बसला आहे़ मंगळवारी दुपारी १ वाजून ३७ मिनिटाला हा गूढ आवाज झाला़ या आवाजाने कळंब तालुक्यातील इटकूरसह इतर गावे तसेच भूम तालुक्यातील ईट, भूम शहर व परिसर, परंडा तालुक्यातील जवळासह अन्य गावांमध्ये या आवाजाची तीव्रता जाणवली़ जोरदार आवाजामुळे घरावरील पत्रे, तावदाने आदळली़ असे आवाजा जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून सातत्याने होत आहेत़ या आवाजाची नोंद ही भूकंपमापन केंद्रातही होत नाही़ शिवाय, यावर नागपूरच्या ‘जिआॅलॉजिकल सर्व्हे आॅफ इंडिया’ या संस्थेच्या माध्यमातून दोनवेळा अभ्यास करण्यात आला आहे़ मात्र, कोणत्याही ठोस निष्कर्षापर्यंत प्रशासनाला पोहोचता आलेले नाही़ 

ठोस कारण अजूनही समजले नाहीभूगर्भातील पाण्याचा स्तर खालावू लागल्यानंतर निर्माण होणाऱ्या पोकळीतील हवा ही एखाद्या बोअरच्या किंवा अन्य छिद्राच्या माध्यमातून बाहेर पडते, तेव्हा असा आवाज होतो, असेच स्पष्टीकरण बहुतांश वेळा उस्मानाबाद जिल्ह्यात सातत्याने होणाऱ्या या आवाजाबाबत मिळते़ दोन महिन्यांपूर्वीच पुन्हा एकदा यावर सर्वेक्षण झाले आहे़ मात्र, त्याचा अहवाल अजून तयार झाला नसल्यामुळेही ठोस कारण समोर येऊ शकलेले नाही़

टॅग्स :Earthपृथ्वीOsmanabadउस्मानाबाद