एका दुचाकीसह चोरटा ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:24 IST2021-06-02T04:24:47+5:302021-06-02T04:24:47+5:30

हॉटेल चालू ठेवले; दोघांविरुध्द गुन्हे उस्मानाबाद : जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश झुगारून व्यवसाय चालू ठेवल्याप्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल ...

Thief in possession of a two-wheeler | एका दुचाकीसह चोरटा ताब्यात

एका दुचाकीसह चोरटा ताब्यात

हॉटेल चालू ठेवले; दोघांविरुध्द गुन्हे

उस्मानाबाद : जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश झुगारून व्यवसाय चालू ठेवल्याप्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल झाले आहेत. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी हे आदेश लागू केले आहेत. असे असतानाही परंडा तालुक्यातील वाकडी येथील तानाजी मारुती सोनमाळी व वारदवाडी येथील सफिक चाँद शेख यांनी ३० मे रोजी त्यांचे हॉटेल व्यवसाय चालू ठेवले. ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांच्याविरुध्द पोलिसांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून परंडा पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

क्षुल्लक कारणावरून एकास केली मारहाण

उस्मानाबाद : शहरातील तुळजापूर नाका भागात २८ मे रोजी अजय दशरथ काळे यांना एका महिलेकडून स्कुटीचा धक्का लागला. यावर अजय काळे यांनी त्या महिलेच्या दुचाकीची चावी काढून घेतली. यावेळी तेथे उपस्थित असलेले नाना पेठे यांनी अजय काळे यांना तसे न करण्याची विनंती केली असता अजय काळे यांच्यासह अन्य दोघा जणांनी नाना पेठे यांना मारहाण केली. याप्रकरणी नाना पेठे यांच्या फिर्यादीवरून येथील शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Thief in possession of a two-wheeler